---Advertisement---

डी कॉकचा ‘बुलेट’ चौकार थेट रोहितच्या डोक्यावरुन गेला अन् चाहत्यांच्या काळजात धस्स केलं, बघा तो प्रसंग

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 10:19 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२१ दुसऱ्या सत्राच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. पण गुरुवारी (२३ सप्टेंबर) जेव्हा तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळायला मैदानावर उतरला, तेव्हा एक मोठ्या संकटातून थोडक्यात बचावला. त्याचा सलामीचा साथीदार क्विंटन डी कॉकने एक जोरदार शॉट खेळला, ज्यातून रोहित शर्मा थोडक्यात वाचला. रोहित खूप भाग्यवान ठरला, त्याने क्षणात जमिनीवर पडून स्वतःला वाचवले.

सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या डी कॉकने ९ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हा जबरदस्त शॉट खेळला. आंद्रे रसेलच्या सरळ येणारा चेंड दक्षिण आफ्रिकेच्या या सलामीवीराने जोरात टोलावला. चेंडू सरळ ४ धावांसाठी सीमारेषेवर पोहोचला. यावेळी नॉन स्ट्राईकवर रोहित उभा होता. डी कॉकने फटकावलेला चेंडू वेगात त्याच्या दिशेने आला, तेव्हा त्याने जमिनीवर पडून स्वतःला वाचवले.

या थरारक प्रसंगानंतरही रोहित डी कॉकचे कौतुक करायला विसरला नाही. जेव्हा चेंडूने सीमारेषा ओलांडली, तेव्हा रोहित डी कॉकने मारलेल्या शॉटच्या स्तुती करताना दिसला.

https://twitter.com/Shubham73106588/status/1441074826098069516?s=20

दरम्यान, फलंदाजीचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर मुंबईने जोरदार फटकेबाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी दमदार फटकेबाजी करत पॉवरप्लेमध्ये ५६ धावा कुटल्या. मुंबईच्या डावात उल्लेखनीय बाब म्हणजे , क्विंटन डी कॉकने आपल्या आयपीएल कारकिर्दीचे १६ वे अर्धशतक ३७ चेंडूत पूर्ण केले. मात्र, तो १५ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला. सुनील नरेनने शानदार झेल घेत त्याची शानदार खेळी संपवली. डी कॉकने ४२ चेंडूत ४ चौकार आणि 3 षटकारांसह ५५ धावा केल्या.

तत्पूर्वी, रोहित आणि डी कॉकने पहिल्या विकेटसाठी ९.२ षटकांत ७८ धावांची शानदार भागीदारी करून मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून केली. रोहित ३३ धावा करून बाद झाला. सुर्यकुमार यादवने ५ धावा केल्या तर ईशान किशन १४ धावा केल्या. पोलार्डने २१ धावांची खेळी केली तर कृणाल पांड्या १२ धावांवर बाद झाला. सौरव तिवारी ५ धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे मुंबईने कोलकाता संघाला १५५ धावांचे आवाहन दिले होते. प्रत्युत्तरात वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने १५.१ षटकात ७ विकेट्सने हा सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

बोल्टच्या चेंडूवर व्यंकटेशचा ‘क्लासिक’ षटकार; डगआऊटमधून भज्जीही म्हणाला, ‘मान गये अय्यर’!

आयपीएलच्या धुमधडाक्यात ‘या’ क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनामुळे परतला घरी

थरारक विजयानंतर केकेआरच्या संघनायकाला जबर धक्का, २४ लाखांचा झाला दंड; पुन्हा चूकल्यास…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---