दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा (sa vs ind odi series) शेवटाचा सामना रविवारी केपटाऊनमध्ये खेळला गेला. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि दक्षिण अफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेने ४९.५ षटकात ३८७ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. अफ्रिकी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de cock) याने या सामन्यात महत्वपूर्ण शतक केले आणि स्वतःच्या नावावर अनेक विक्रम देखील नोंदवले.
सामन्यात पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्स घेतल्या. परिणामी, विरोधी संघ ५० वे षटक संपण्यापूर्वीच सर्वबाद झाला. पण, दक्षिण अफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉकने मात्र मोठी खेळी केली. ज्यामुळे त्यांचा संघ अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. डी कॉकने या सामन्यात १३० चेंडू खेळले आणि १२४ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. या खेळीनंतर डी कॉक दुसरा सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
सर्वाधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये डी कॉक आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत शतक केल्यानंतर त्याने स्वतःचे १७ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. या यादीत श्रीलंकेचा महान कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) पहिल्या क्रमांकावर आहे. संगकाराने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण २३ शतके ठोकली आहेत.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आहे. गिलख्रिस्टने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण १६ शतके केली. त्यानंतर या यादीत चौथ्या क्रमांकावर दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्स आहे. डिविलियर्सने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत दक्षिण अफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना एकूण १० शतके केली आहेत.
दरम्यान, दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील या शेवटच्या एकदिवसीय सामन्याचा विचार केला, तर डी कॉकने त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. रासी वॅन डर ड्यूसेनने सामन्यात डी कॉकची चांगली साथ दिली आणि वैयक्तित ५२ धावा केल्या. डी कॉक आणि ड्यूसेन यांनी सामन्यात १४४ धावांची महत्वाची भागीदारी केली.
महत्वाच्या बातम्या –
लक्ष्मणच्या महानतेचे आणखी एक उदाहरण! अचानकपणे पोहचला युगांडा संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
संधी मिळताच चहरने करून दाखवली अशी कामगिरी, जी तीन वर्ष करण्यास तरसलेले गोलंदाज
कॅप्टन केएलचा ‘रॉकेट थ्रो’ आणि बवुमा तंबूत; पाहा व्हिडिओ
व्हिडिओ पाहा –