सध्या कोरोना व्हायरसने अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे, यामध्ये क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्याच कारणाने अनेक मोठ्या स्पर्धा रद्द झाल्या, तर काही पुढे ढकलण्यात आल्या. नुकतेच बीसीसीआयने देखील मोठा निर्णय घेत भारतातील ३ देशांतर्गत स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या ३ स्पर्धांमध्ये मानाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.
उनाडकटचे ट्वीट का ठरतंय चर्चेचा विषय?
कोरोना व्हायरसच्या कारणाने गेल्या दोन हंगामापासून रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होण्यास मुहूर्त मिळालेला नाहीये. त्यामुळेच सौराष्ट्र संघाचा कर्णधार असलेल्या जयदेव उनाडकटने तो लाल चेंडूने क्रिकेट खेळण्याची प्रतिक्षा करत असल्याचे ट्वीट केले आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत प्रथम श्रेणी सामने खेळले जात असल्याने हे सामने लाल रंगाच्या चेंडूने खेळले जातात.
बीसीसीआयने रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धा पुढे ढकलल्याचे जाहीर केल्यानंतर काहीवेळातच जयदेव उनाडकटने ट्वीट केले की, ‘प्रिय लाल चेंडू, प्लीज मला आणखी एक संधी दे, मी तुला वचन देतो की, तुला माझा नक्की अभिमान वाटेल.’
Dear red ball, please give me one more chance.. I’ll make you proud, promise! pic.twitter.com/ThPUOpRlyR
— Jaydev Unadkat (@JUnadkat) January 4, 2022
उनाडकटचे हे ट्वीट सध्या चर्चेत असून व्हायरल होत आहे. याचं दुसरं एक कारण म्हणजे, सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने खेळत असून उनाडकट गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने अखेरचा आणि एकमेव कसोटी सामना २०१० साली खेळला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्यूरियनमध्ये हा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नव्हते. त्यानंतर उनाडकटला भारताकडून कसोटी खेळण्यासाठी संधी मिळालेली नाही.
उनाडकटची प्रथम श्रेणी कारकिर्द
असे असले तरी, उनाडकटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत ८९ प्रथम श्रेणी सामने खेळताना ३२७ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने २० वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याची आणि ५ वेळा एका सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१९-२० रणजी ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद सौराष्ट्र संघाने मिळवले होते. तसेच त्याआधीच्या हंगामात सौराष्ट्र संघ त्याच्याच नेतृत्त्वाखाली उपविजेता ठरला होता.
अधिक वाचा – कोरोनापुढे बीसीसीआयने टेकले गुडघे, रणजी ट्रॉफीसह ‘या’ २ देशांतर्गत स्पर्धा केल्या स्थगित
उनाडकटने सोशल मीडिया युजरला सडेतोड उत्तर
उनाडकटेने केलेल्या ट्वीटवर एका युजरने त्याला प्रश्न विचारला की, ‘भाऊ, तुम्ही कोणत्या वेगाने गोलंदाजी करता?’ यावर उनाडकटने उत्तर दिले की, ‘मला ज्या वेगाने विकेट मिळते त्या वेगाने, जरी माझ्या घरच्या मैदानावरील खेळपट्टी सपाट असली तरी. जर तुम्हाला आकडे पहायचे असतील, तर विस्तृत दृष्टीकोन ठेवून, आकडेवारीचे सर्व कॉलम एकदा पाहा!’
https://twitter.com/JUnadkat/status/1478420728810643457
या स्पर्धा ढकलल्या पुढे
बीसीसीआयने भारतातील वाढत्या कोराना प्रकरणांमुळे रणजी ट्रॉफी व्यतिरिक्त कर्नल सीके नायडू ट्रॉफी आणि वरिष्ठ महिली टी२० लीग या देशांतर्गत स्पर्धा पुढे ढकललेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बिग बॅश लीगला कोरोनाचे ग्रहण! ग्लेन मॅक्सवेलसह १२ खेळाडू कोविड पॉसिटीव्ह
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत ९ तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ पाहा – संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज






