पुणे, दि. 13 डिसेंबर 2023 – डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो कटककर करंडक’ स्पर्धेत डेक्कन जिमखाना, ईस्टर्न रेल्वेया संघांनी दुसरा विजय मिळवला.
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने टिळक तलावावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने कोलकत्ता स्पोर्टस असोसीएशन संघाचा 13-12 असा संघर्षपूर्ण पराभव केला. डेक्कन जिमखाना संघाकडून ऋतुराज बिडकर 4, पियुष सूर्यवंशी 4, अभिजीत मोकाशी 1, मनीष खोमणे 2, अर्जुन देशमुख 1, शुभा धायगुडे 1 यांनी गोल केले. कोलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशनकडून सौविक ढाली 4, एसके. अल्विरिझा 3, फिरोज सरदार 3, बिस्वजित दत्ता 1, शुभदीप हलदर 1 यांनी गोल केले. दुसऱ्या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने रायगड संघाचा 9-5 असा पराभव केला.
अन्य लढतीत कुमरजीत दत्ता 4, किशोर राऊत 3, जयंता जना 2, चंदन सरकार 2, ओमप्रकाश प्रसाद 1 यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या ईस्टर्न रेल्वे संघाने अमरावती संघावर 12-4 असा विजय मिळवला. एअर फोर्स संघाने मध्य रेल्वेचा 7-5 असा तर, नेव्ही संघाने किदारपूर संघाचा 9-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
एकतर्फी झालेल्या लढतीत वेस्टर्न रेल्वे संघाने मिदनापूर स्विमिंग पूल संघाचा 21-01 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी अर्जुन कवळे 6, सारंग वैद्य 5, अश्विनीकुमार कुंडे 2, श्रेयस वैद्य 3, आशिष आंबाळकर 1, अक्षय कुमार कुंडे 1, करण शुक्ला 2, भूषण पाटील 1 यांनी गोल केले.
याआधी स्पर्धेचे उदघाटन व कटककर करंडक’चे अनावरण जागतिक एक्वेटिकचे सदस्य विरेंद्र नानावटी, स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव मोनल चोकसी आणि कटककर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत कटककर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, संयोजन समितीचे सचिव अमित गोळवळकर, जय आपटे, नीता तळवळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी:
रायगड: 6(दिनांशू कुठे 3, सर्वेश माने 1, साहिल कुठे 1, प्रेम पाटील 1) वि.वि.किदारपूर: 4(अनिर्बन मोंडल 2, अभिषेक प्रसाद 1, माणिक मोंडल 1);
डेक्कन जिमखानाः 13(ऋतुराज बिडकर 4, पियुष सूर्यवंशी 4, अभिजीत मोकाशी 1, मनीष खोमणे 2, अर्जुन देशमुख 1, शुभा धायगुडे 1) वि.वि.कोलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन: 12(सौविक ढाली 4, एसके. अल्विरिझा 3, फिरोज सरदार 3, बिस्वजित दत्ता 1, शुभदीप हलदर 1);
ईस्टर्न रेल्वेः 12(कुमरजीत दत्ता 4, किशोर राऊत 3, जयंता जना 2, चंदन सरकार 2, ओमप्रकाश प्रसाद 1) वि.वि.अमरावती: 4(आदित्य थेटे 1, वेदांत नितीन 1, शिवम घाडगे 1, आलोक देशमुख 1);
राजकोट:7 (आर्यन जोशी 1, युग प्रजापती 4, लवित्रा खोखर 2)वि.वि.सिल्व्हरफिन्स भोपाळ: 3 (पुष्पक लांडे 1, सोमेश शर्मा 1, मानस तिवारी 1);
एअर फोर्स:7(सिबिन वर्गीस 2, कल्पेश मांडवी 2, प्रवीण जीके 3)वि.वि.मध्य रेल्वे: 5(रोहित बीएस 1, उदय उत्तेकर 3, देवेंद्र जोशी 1);
वेस्टर्न रेल्वेः 21(अश्विनीकुमार कुंडे 2, श्रेयस वैद्य 3, अर्जुन कवळे 6, सारंग वैद्य 5, आशिष आंबाळकर 1, अक्षय कुमार कुंडे 1, करण शुक्ला 2, भूषण पाटील 1)वि.वि.मिदनापूर स्विमिंग पूल: 1(अरीत्रा दास 1);
नेव्ही: 9(अनंतू जीएस 3, सुमित प्रसाद 1, मिदून एजे 1, वैभय कुठे 1, अमल एमबी 1, संदीप डीएस 2)वि.वि.किदारपूर: 1(अनिर्बन मंडल 1);
डेक्कन जिमखाना: 9(स्वयम परदेशी 2, ऋतुराज बिडकर 1, मनीष खोमणे 2, शुभम धायगुडे 1, पियुष सूर्यवंशी 3)वि.वि.रायगड: 5(दिनांशू कुठे 3, सुजय भोईर 2);
ईस्टर्न रेल्वेः11(जयंता जना 6, चंदन सरकार 1, सौविक दास 1, सतदीप भट्टाचार्य 1, ओमप्रकाश प्रसाद 1, कुमरजीत दत्ता 1) वि.वि.सिल्व्हर फिन्स भोपाळ: 1(
मानस तिवारी 1).
महत्वाच्या बातम्या –
राजकोटमध्ये घडला इतिहास, विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच खेळणार हरियाणा
श्रीलंकन संघाची प्रदर्शन आता दिग्गजांच्या निर्णयावर ठरणार! बोर्डाकडून नवीन निवड समितीची घोषणा