भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला 50 किलो वजनी गटातच्या अंतिम सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजन जास्त भरल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आलं. विनेश सुवर्णपदक जिंकणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र फायनलच्या दिवशी सकाळी तिला अपात्र घोषित करण्यात आलं. यानंतर विनेशने तिला किमान रौप्य पदक मिळावं, यासाठी सीएएसकडे आवाहन केलं आहे. याबाबत निर्णय आज रात्री येणार आहे.
विनेश फोगटचा खटला भारतातील सर्वात नामंकित वकील हरीश साळवे लढत आहेत. कुस्तीपटू विनेश फोगटच्या ऑलिम्पिक अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर क्रीडा लवाद न्यायालय (CAS) आज भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता निकाल देणार आहे. आता विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
वृत्तानुसार, सुनावणीत विनेश फोगट हिनं अनेक मुद्दे उपस्थित केले होते. विनेशनं कोणतीही फसवणूक केलेली नाही, हे स्पष्ट आहे, त्यामुळे तिला रौप्य पदक देण्यात यावं, असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान करण्यात आला. दुसरी बाजू अशी मांडण्यात आली की, विनेश फोगटचं वजन वाढणं ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया होती, ज्यामध्ये ती काहीही करू शकत नव्हती.
याशिवाय, खेळाडूला त्याच्या शरीराची काळजी घेण्याचा अधिकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी विनेशचं वजन निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचा चौथा आणि शेवटचा युक्तिवाद करण्यात आला आहे. दरम्यान, पौष्टिक पदार्थांचं सेवन करणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.
वृत्तानुसार, या प्रकरणाच्या सुनावणीत सुमारे तासभर चर्चा झाली. आता यावर आज निर्णय येणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, विनेश फोगट आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. यापूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक विनेश फोगटला हे प्रकरण CAS कडे नेण्याचा विरोध करताना दिसले होते. ते म्हणाले की, हे सर्व युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) च्या नियमांनुसार होत आहे. अशा स्थितीत दोन रौप्यपदक विजेते घोषित होण्याची फारशी आशा दिसत नाही.
हेही वाचा –
निवृत्तीनंतरही गोलकीपर श्रीजेश भारतीय संघासोबतच राहणार, हॉकी इंडियानं सोपवली मोठी जबाबदारी
धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार? आर अश्विनची प्रतिक्रिया चर्चेत
पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू