श्रीलंका क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात श्रीलंका आणि भारत संघात (India vs Sri Lanka) ३ टी२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यास येणार आहे. यातील टी२० मालिका गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला जोरदार धक्का बसला आहे. भारताचे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) हे दोन खेळाडू या टी२० मालिकेतून बाहेर पडले आहेत.
यापूर्वी हे दोन्ही खेळाडू टी२० मालिकेतून बाहेर होणार असल्याची चर्चा होती. पण बुधवारी (२३ फेब्रुवारी) बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जाहीर करत या चर्चांना पुष्टी दिली. त्यामुळे आता सूर्यकुमार आणि दीपक हे दोघेही श्रीलंकेविरुद्धची टी२० मालिका खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीसीसीआयने माहिती दिली आहे की, नुकत्याच कोलकातामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान सूर्यकुमार आणि दीपक या दोघांनाही दुखापत झाली. रविवारी (२० फेब्रुवारी) झालेल्या या तिसऱ्या सामन्यात दीपकला गोलंदाजी करताना मांडीचा स्नायू दुखावला गेला आहे. तसेच सूर्यकुमारच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले आहे (Deepak Chahar and Suryakumar Yadav ruled out of T20I Series).
दरम्यान, या दोघांच्याही जागेवर बदली खेळाडूची निवड केली जाणार नाही. त्यामुळे आता १८ ऐवजी १६ जणांचा संघ टी२० मालिकेसाठी सज्ज असेल. तसेच सूर्यकुमार आणि दीपक हे दोघेही आता आपल्या दुखापतींवर काम करण्यासाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल होतील.
https://twitter.com/BCCI/status/1496356558242197504
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या –
T20 WC 2022: युएई ८ वर्षांनी खेळणार टी२० विश्वचषकात, आयर्लंडही स्पर्धेसाठी पात्र
…आणि सर्वात मोठ्या रनचेजमध्ये अर्धवट नशेत गिब्जने केली वादळी खेळी






