भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवारी (२८ जुलै) पार पडला. या सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार पुनरागमन करत भारतीय संघावर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात राहुल चाहर चर्चेचा विषय बनून होता. श्रीलंकन फलंदाजाला माघारी धाडल्यानंतर त्याने स्वतःवरचे नियंत्रण गमावल्याचे पाहायला मिळाले होते.
भारतीय संघाचा युवा फिरकीपटू राहुल चाहर हा गडी बाद केल्यानंतर नेहमी उत्साहात दिसून येत असतो. असाच काहीसा उत्साह दुसऱ्या टी-२० सामन्यात देखील दिसून आला होता. तर झाले असे की, श्रीलंका संघ धावांचा पाठलाग करत असताना १५ वे षटक टाकण्यासाठी राहुल चाहर गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या वानिंदू हसरंगाने पॉईंटच्या दिशेने शॉट खेळला. त्यावेळी पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या भुवनेश्वर कुमारने अप्रतिम झेल टिपला. हा झेल पाहून राहुल चाहरने आपले स्वतःवरचे नियंत्रण गमावले होते. यावेळी रागात त्याने फलंदाजाला काहीतरी म्हटले देखील होते. (Deepak chahar became aggressive after taking wicket of wanindu hasaranga, watch video)
राहुल चाहर खूप आक्रमक झाला होता. परंतु बाद झालेला फलंदाज हसरंगा टाळ्या वाजवत निघून जातो. हसरंगा हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की, त्याने खरच खूप चांगला चेंडू टाकला होता.
#RahulChahar in aggression!
Well played #TeamIndia 👏👏👏👏#SLvIND #SLvsIND #INDvSL #IndvsSL #cricketpic.twitter.com/VE3z4wK8eR— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) July 28, 2021
या सामन्यात मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीत देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, चेतन सकारिया आणि नितीश राणा यांना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती.
श्रीलंका संघाने ४ गडी राखून मिळवला विजय
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ बाद १३२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून धनंजय डी सिल्वाने खेळलेल्या नाबाद ४० धावांची खेळी केली. हा सामना श्रीलंका संघाने ४ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत फ्लॉप ठरलेला संजू यष्टीमागेही फेल, कर्णधार धवनला करायला लावली ‘मोठी चूक’!
श्रीलंंकेच्या सलामीवीराची विकेट भुवीसाठी ठरली विक्रमी, पूर्ण केले टी२० विकेट्सचे ‘अर्धशतक’