भारत आणि श्रीलंका संघांमध्ये दुसरा एकदिवसीय सामना मंगळवारी (20 जुलै) खेळण्यात आला. पहिल्या सामन्यात सुलभ विजय मिळवून भारताने रणसिंग फुंकले. त्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यातही 3 विकेट्सने श्रीलंकेला पराभूत करत आपले वर्चस्व कायम राखले. दरम्यान श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगाला बाद केल्यानंतर दीपक चाहरने विचित्र पद्धतीने आनंद साजरा केला. सध्या त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे.
40 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दीपक चाहरने आपल्या गोलंदाजीत थोडा बदल करत स्लो यॉर्कर टाकला. श्रीलंकेचे फलंदाज हसरंगा आणि असलंंक हे धावा जोडत संघाला मोठ्या आघाडीच्या दिशेने नेण्यासाठी झगडताना दिसत होते. पण चाहरने तसे होऊ दिले नाही. चाहरच्या गोलंदाजीने हसरंगा पायाजवळून चेंडू हिट करायला. पण चेंडू थेट जाऊन यष्टीला लागला आणि तो त्रिफळाचित झाला. अशा प्रकारे चाहरला डावातील दुसरी विकेट मिळाली.
हसरंगाला बाद केल्यानंतर चाहरला खूप आनंद झाला आणि त्याने आपल्या विकेटचा आनंद साजरा केला. त्याने सुरुवातीला दोन्ही हात वर करत पक्षाप्रमाणे पंख पसरल्याची कृती केली. त्यानंतर एका हाताची दोन बोटे करत सेलिब्रेशन केले. त्यावेळी त्याच्या सेलिब्रेशनवरुन हे स्पष्ट दिसून येत होते की, त्याच्या आनंदाला कोणतीही सीमा नव्हती.
Deepak Chahar fools Hasaranga with a slower one right on the money ????
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 1 (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/QYC4z57UgI) now! ????#SLvINDOnlyOnSonyTen #HungerToWin #Chahar pic.twitter.com/awfhkBBJYY
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 20, 2021
चाहरने श्रीलंका संघाविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात दिवसाची प्रभावी सुरुवात केली नव्हती. त्याच्या पहिल्या तीन षटकांत त्याने तब्बल 25 धावा दिल्या होत्या. परंतु, नंतर त्याने खेळात पुनरागमन केले. मधल्या षटकांत त्याने प्रथम धनंजया डी सिल्वाची महत्त्वपूर्ण विकेट मिळविली होती. त्यानंतर हसरंगाच्या रुपात दुसरी विकेट घेतली होती.
गोलंदाजीबरोबर दिपक चाहरने या सामन्यात फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद 69 धावा केल्या होत्या. तसेच 49 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार मारत संघाला विजयही मिळवून दिला होता. त्याला या सामन्यात सामनावीर पुरस्कारही मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलनंतर आता भारताचा ‘हा’ खेळाडूही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून होणार बाहेर?
Video: लाईव्ह सामन्यात भिडले प्रतिस्पर्धी संघ अन् केली बेदम मारहाण, काहींनी तर बॅटने दिला चोप





