भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला यजमान इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंड संघाची बुधवारी (२१ जुलै) घोषणा करण्यात आली आहे. या संघात १७ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड संघात अनेक दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. यात बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, सॅम करन यांचा समावेश आहे. यातील काही खेळाडू दुखापतीतून पुनरागमन करणार आहेत, तर काहींना मागील काही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती.
याशिवाय काहीवर्षांपूर्वी वादग्रस्त ट्विट केल्याच्या आरोपामुळे जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान वादात सापडलेल्या ऑली रॉबिन्सनलाही भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड संघात संधी मिळाली आहे. तसेच हसीब हमीद यालाही संधी देण्यात आली आहे.
इंग्लंडच्या १७ जणांच्या संघात २ फिरकीपटू आणि ५ वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. यावर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर खेळलेला इंग्लंड संघच जवळपास कायम करण्यात आला आहे. जो रुट संघाचे कर्णधारपद सांभाळेल.
मात्र, भारताविरुद्धच्या अगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स यांना दुखापतीमुळे सामील करण्यात आलेले नाही. याशिवाय बेन फोक्स आणि ऑली स्टोनही दुखापतीमुळे या सामन्यांसाठी उपलब्ध नसतील.
कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेला सुरुवात
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी अगामी कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण ही मालिका कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे या मालिकेतून अधिकाधिक गुण मिळवून स्पर्धेची सुरुवात दमदार करण्याची दोन्ही संघांना संधी असणार आहे.
असा आहे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी इंग्लंड संघ –
जो रुट (कर्णधार), जोस बटलर, जॅक लीच, ऑली पोप, जॅक क्रॉली, जेम्स अँडरसन, डॉम बेस, सॅम करन, ऑली रॉबिन्सनस, हसीब हमीद, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, मार्क वू़ड, जॉनी बेअरस्टो.
असा आहे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला
असे आहे इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
Video: लाईव्ह सामन्यात भिडले प्रतिस्पर्धी संघ अन् केली बेदम मारहाण, काहींनी तर बॅटने दिला चोप
बोललो तर बोललो! आधी यष्टीमागून इशानने श्रीलंकेच्या फलंदाजाला दिली ‘वॉर्निंग’, मग काय केलं रनआऊट
विजयाच्या जवळ पोहोचूनही श्रीलंकेच्या पदरी निराशा, पण कर्णधाराने ‘असे’ भाष्य करत जिंकली लाखो मने