---Advertisement---

कोलंबो टी२०त ‘मांकडिंग’, दिपक चाहरची श्रीलंकेच्या फलंदाजाला चेतावणी; बघा व्हिडिओ

On: मंगळवार, जुलै 27, 2021 10:41 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला आहे. आता या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला. यासह या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना दीपक चाहर आर अश्विनने केलेल्या कृतीची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात होता.

या सामन्यातील दुसऱ्या डावात श्रीलंका संघ फलंदाजी करत असताना, कर्णधार शिखर धवनने १६ वे षटक टाकण्याची जबाबदारी दीपक चाहरकडे सोपवली होती. या षटकात गोलंदाजी करताना त्याने आर अश्विनची आठवण करून दिली होती. तर झाले असे की, जेव्हा दीपक चाहर गोलंदाजी करण्यासाठी आला होता; तेव्हा श्रीलंका संघाला शेवटच्या ५ षटकात विजयासाठी ५८ धावांची आवश्यकता होती. जेव्हा त्याने पहिला चेंडू टाकण्यासाठी धाव घेतली; तेव्हा त्याने पाहिले की, नॉन स्ट्राइकवर असलेला फलंदाज असलंका क्रिजच्या बाहेर जात आहे.

असलंकाला क्रिजच्या बाहेर निघताना पाहून दीपक चाहरने चेंडू टाकलाच नाही. त्यानंतर त्याने चेंडू यष्टीला मारून फेकण्याचा इशारा करत मांकडींग करण्याची धमकी देखील दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेक चाहते यावर आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. (Deepak chahar mankading video went viral on social media)

https://twitter.com/All_aboutsport_/status/1419352574939959297?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1419352574939959297%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fdeepak-chahar-gave-warning-to-charith-asalanka-for-mankading-in-1st-t20i-80424

पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा जोरदार विजय
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १६४ धावा केल्या होत्या. यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५० आणि कर्णधार शिखर धवनने ४६ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून चरिथ असलंकाने ४४ आणि अविष्का फर्नांडोने २६ धावांची खेळी केली. श्रीलंका संघाचा डाव १८.३ षटकात संपुष्टात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला. तसेच ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाने काढला पराभवाचा वचपा, ११७ चेंडू बाकी असतानाच विंडीजवर मात; वनडे मालिकाही जिंकली

जगामागून येऊनही सर्वत्र सूर्याचाच डंका! माजी कोच म्हणे, ‘तो विराट, रोहित, हार्दिक अन् रिषभच्याही बरोबरीचा’

दुखापतींनी पिडलेल्या विराटसेनेसाठी आली आनंदाची बातमी, ‘प्रमुख खेळाडू’ने सुरू केला सराव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---