---Advertisement---

दुखापतींनी पिडलेल्या विराटसेनेसाठी आली आनंदाची बातमी, ‘प्रमुख खेळाडू’ने सुरू केला सराव

Virat-Kohli-and-Ajinkya-Rahane
---Advertisement---

मागील एक महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीने ग्रासले आहे. दुखापतीमुळे भारतीय संघाला लागोपाठ ३ क्रिकेटपटूंना आगामी कसोटी मालिकेतून बाहेर करावे लागले आहे. परंतु आता इंग्लंडमधून आनंदाची बातमी पुढे येत आहे. हॅमस्ट्रिंगने त्रस्त असलेला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे वेगाने बरा होत आहे. ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध नॉटिंघम येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी तो सरावासाठी मैदानात उतरला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेपुर्वी भारताने काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध डरहॅम येथे सराव सामना खेळला होता. या सामन्यात कसोटीपटू रहाणे अनुपस्थित होता. त्याच्या डाव्या पायात हॅमस्ट्रिंगच्या वेदना जाणवत असल्याने त्याला इंजेक्शन घ्यावे लागले होते. यामुळे तो या ३ दिवसीय सराव सामन्यात खेळू शकला नाही.

पण सोमवारी (२६ जुलै) तो पुन्हा मैदानावर परतला आहे. यावेळी त्याने केवळ क्षेत्ररक्षण आणि शारिरीक प्रशिक्षण घेतले नसून तो इतर खेळाडूंसह डरहॅमच्या काउंटी रिव्हरसाईड मैदानावरील नेट सेशनमध्येही सहभागी झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत घट झाली आहे. रहाणे सराव करताना दिसून आल्याने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

असे असले तरीही, रहाणे दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकल्यास श्रीलंका दौऱ्यावरुन इंग्लंडला येणारे खेळाडू सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी एकाला त्याच्याजागी मधल्या फळीत खेळवले जाईल. परंतु जर क्वारंटाईनमुळे हे दोन्ही खेळाडू पहिल्या कसोटीसाठी अनुपलब्ध राहिले तर केएल राहुल रहाणेची जागा घेऊ शकतो.

दुखापतीमुळे ३ खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
दुर्दैवाची बाब म्हणजे, दुखापतींमुळे भारतीय संघाने आपले २ प्रमुख खेळाडू आणि एक प्रतिभाशाली राखीव खेळाडू गमावला आहे. सलामीवीर शुबमन गिल कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला जखम झाली होती, ज्यामुळे तो मायदेशी परतला आहे. त्याबरोबरच सराव सामन्यादरम्यान अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाद आवेश खान यांनाही दुखापतीने ग्रासल्याने ते उर्वरित दौऱ्यासाठी उपलब्ध नसतील.

महत्त्वाच्या बातम्या-

कोहलीचा आयपीएल भिडू पडिक्कलला इंग्लंडवरुन का आलं नाही बोलावण? कारण आले पुढे

पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव मुकणार श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्याला?

थाला फॅन्सची इच्छा झाली पूर्ण; ‘रेट्रो जर्सी’मध्ये दिसला एमएस धोनी, फोटो भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---