---Advertisement---

चाहरचा मॅच विनिंग चौकार अन् सूर्याने आहे त्या अवस्थेत धावत येत मारली मिठी, पाहा तो अप्रतिम क्षण

On: बुधवार, जुलै 21, 2021 11:12 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मंगळवारचा दिवस (२० जुलै) न विसरण्याजोगा राहिला. कोलंबोच्या मैदानावर श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात दुसरा वनडे सामना रंगला होता. अखेरपर्यंत या सामन्यात यजमान श्रीलंकाचे वर्चस्व होते. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दमदार प्रदर्शन करत श्रीलंकेने भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. परंतु वेगवान गोलंदाज दिपक चाहर याने सामन्याचा कायापालट केला. नाबाद अर्धशतकी खेळी केल्यानंतर शेवटच्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचत त्याने संघाचा विजय साजरा केला. यानंतरचे दृश्य पाहण्यासारखे होते.

श्रीलंकेच्या २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३६ व्या षटकापर्यंत भारतीय संघ ७ बाद १९३ धावांवर होता. आता केवळ भारताचे खालच्या फळीतील खेळाडू अर्थातच गोलंदाज खेळायचे बाकी होते आणि संघाला विजयासाठी अजून ८३ धावा करण्याची आवश्यकता होती, त्यामुळे भारताचा पराभव निश्चित असल्याचे सर्वांना वाटत होते. परंतु आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत दिपक चाहरने शेवटच्या षटकापर्यंत चिवट झुंज दिली. त्याच्या जोडीला भुवनेश्वर कुमारनेही नाबाद राहत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

दोघांनी मिळून ४९ व्या षटकापर्यंत संघाला २७३ धावांपर्यंत पोहोचवले. ५० व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चाहरने कसून रजाताविरुद्ध जबरदस्त शॉट खेळला आणि चेंडू थेट सीमारेषेपार गेला. अशाप्रकारे चौकारासह चाहरने विजयी पताका झळकावली. प्रशंसनीय अर्धशतकी झुंजीनंतर अशाप्रकारे सामन्याचा शेवट केल्याचे पाहून समालोचकानेही आनंद व्यक्त केला.

सोनी स्पोर्ट्सने या अविस्मरणीय क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत चाहर मॅच विनिंग शॉट खेळल्यानंतर हेल्मेट काढून हातातील बॅट उंचावत जल्लोष साजरा करताना दिसत आहे. डगआउटमध्ये बसलेले सर्व खेळाडू प्रशिक्षकही उभे राहुन टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक करत आहेत. एवढेच नव्हे तर, भारताकडून अर्धशतकी खेळी करणारा सूर्यकुमार यादव आहे त्या अवस्थेत धावत येत चाहरला मिठी मारतो. त्याच्या मागोमाग पृथ्वी शॉसुद्धा त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतो. दुसरीकडे पराभूत झालेल्या श्रीलंका संघाचे प्रशिक्षक मिथी आर्चर मात्र रागेरागे ड्रेसिंग रूममध्ये जात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

दिपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारची यशस्वी भागिदारी
दुसऱ्या वनडे सामन्यात चाहरने ८२ चेंडूंमध्ये नाबाद ६९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले. तसेच भुवनेश्वर कुमारने २८ चेंडूंमध्ये नाबाद १९ धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे दोघांनी आठव्या गड्यासाठी नाबाद ८६ धावांची विक्रमी भागिदारी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

‘टीम धवन’च्या विजयाचा आनंद द्विगुणित, सॅमसन दुखापतीतून सावरला; पण तिसरा वनडे खेळणार का?

चाहरचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर द्रविडने डगआऊटमधून दिला ‘सिक्रेट मॅसेज’ अन् भारताने मालिका खिशात घातली

राडा! टीम इंडियाकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेच्या कोच-कर्णधाराचा पीचवर राडा, अगदी…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---