भारतीय क्रिकेट संघ इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२ हंगामापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक होणार आहे. तोपर्यंत भारतीय संघ अधिकाधिक टी२० सामने खेळण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघ प्रत्येक मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देतोय. त्याचवेळी आयपीएलपूर्वी दुखापतग्रस्त झालेला भारताचा अष्टपैलू दीपक चहर हा देखील संघात पुनरागमन करत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झालीये.
हॅमस्ट्रिंग आणि पाठीच्या दुखापतीमुळे दीपक मार्च महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेतून बाहेर झाला होता. तेव्हापासून त्याने एकही सामना खेळलेला नाही. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला. त्यानंतर भारताने आधी आयर्लंड आणि नंतर इंग्लंडचा दौरा केला. आता वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू आहे. पाच महिन्यांहून अधिक काळ बाहेर राहिल्यानंतर चहर आता पुन्हा संघात आला आहे. तंदुरुस्ती मिळविण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे. तो चेन्नईतील सीएसके अकादमीमध्ये सराव करताना दिसला.
https://www.instagram.com/reel/Cg1revYFhgA/?igshid=YmMyMTA2M2Y=
दीपक चहर १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करणार आहे. हा दौरा त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. इथेच तो आपली तंदुरुस्ती सिद्ध करेल. पुन्हा लयीत येण्यासाठी, आत्मविश्वास मिळवण्यासाठी यापेक्षा चांगली संधी त्याच्याकडे नसेल चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चहर फलंदाजी आणि गोलंदाजी करताना दिसत आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक संघातही भारतीय निवड समिती त्याला ठेवू इच्छिते. तो ज्या पद्धतीने नवीन चेंडू स्विंग करतो ते कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत त्याने बॅटनेही छाप पाडली आहे. खालच्या फळीत फलंदाजीला येत त्याने वेगवान खेळ्या करत संघाला विजय मिळवून दिले आहे. आशिया चषकासाठी संघाची निवड ८ ऑगस्ट रोजी होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकवून देणारे कर्णधार आता आहेत तरी कुठे? एक तर झालायं निवृत्त
भारताची गोल्ड मेडलवर नजर! नाणेफेक जिंकत हरमनप्रीतने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग ११
विराटला टी२० विश्वचषकातूनही वगळणार! बीसीसीआयच्या मोठ्या अधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य