---Advertisement---

Video: चेन्नईने सामना गमावला, पण दीपक चाहरने प्रेमाची मॅच जिंकली, स्टँडमध्ये जाऊन गर्लफ्रेंडला केले प्रपोज

---Advertisement---

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईला ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने जरी पराभव स्वीकारला असला, तरी चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने प्रेमाचा सामना जिंकला आहे. त्याने या सामन्यानंतर सर्वांसमोर आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली.

दीपकने सर्वांसमोर घातली मागणी
झाले असे की हा सामना पंजाबने जिंकला. हा सामना संपताच चाहर खेळाडूंचे कुटुंबिय बसतात त्या स्टँडमध्ये गेला आणि त्याने सर्वांसमोर तिथे काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या मुलीला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घातली. तिनेही क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मागणीला होकार दिला. तिने होकार दिल्यानंतर दीपकने तिच्या बोटात अंगठी घातली. त्यानंतर त्याने त्याच्या खिशातून आणखी एक अंगठी काढून तिच्याकडे दिली. तिने ती दीपकच्या बोटात घातली.

असे असले तरी, दीपकच्या प्रेयसीचे नाव काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या या खास साखरपुड्याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1446115233957769219

दीपकने व्यक्त केला आनंद 
दीपकने या क्षणांचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याने फोटोंना कॅप्शन दिले आहे की ‘हे फोटोच सर्वकाही सांगतात. तुमच्या आशिर्वादाची गरज आहे.’ तसेच त्याने व्हिडिओला कॅप्शन दिले की ‘खास क्षण’.

https://www.instagram.com/p/CUurgKKo1ts/

https://www.instagram.com/p/CUuthsjIPx_/

 

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
दीपकने सर्वांसमोर स्टेडियममध्ये साखरपुडा केल्याने सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी या क्षणांचे फोटो शेअर करत दीपक आणि त्याच्या प्रेयसीला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1446115045117595648

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1446105660144316417

https://twitter.com/Concussion__Sub/status/1446105773948293120

https://twitter.com/CSKFansOfficial/status/1446107035422978056

https://twitter.com/BreatheKohli/status/1446105677928153100

चेन्नईचा पराभव
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसने केलेल्या ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. त्यानंतर १३५ धावांचा पाठलाग पंजाबने १३ षटकांतच पूर्ण केला. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ९८ धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल रणांगणात अशी कामगिरी करणारा एकमेवाद्वितीय फलंदाज बनला ‘क्लासी राहुल’

भारत-ऑस्ट्रेलिया महिला ट्रॉफीला देण्यात यावी ‘या’ २ दिग्गजांची नावं, माजी क्रिकेटरने केली मागणी

उमरान मलिकचे उत्कृष्ट गोलंदाजीसाठी इरफान पठाणला श्रेय; म्हणाला, ‘त्यानी मला सांगितलं होतं…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---