आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी२० सामना दीपक हुड्डा याच्यासाठी अतिशय खास राहिला. कारकिर्दीतील केवळ पाचवा टी२० सामना खेळत असलेल्या हुड्डाची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली आणि त्याने शानदार शतक नोंदवले. पहिल्या सामन्यात सलामीला फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून हे शतक निघाले. या सामन्यानंतर हुड्डाने तो नक्की कोणत्या योजनेसह मैदानात उतरला होता?, याबद्दल सांगितले आहे.
हुड्डाने आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्त्व करताना १५ सामन्यात ४५१ धावा केल्या होत्या. त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला भारतीय संघातही जागा मिळाली होती. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यानंतर हुड्डा म्हणाला की, तो त्याचा आयपीएलमधील फॉर्म आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही कायम ठेवू इच्छित होता आणि त्यात तो यशस्वीही ठरला.
“क्रिकेट खेळताना आम्ही इतकेच शिकलोय की, जास्त दूरचा विचार करायचा नाही. एका वेळी फक्त एकाच सामन्याबद्दल विचार करायचा. जर माझी कामाची नैतिकता चांगली असेल तर मी चांगल्या मानसिकतेसह उतरेल आणि मी चांगल्या धावा करेल. गोष्टी सहज ठेवायच्या, वर्तमानाचा विचार करायचा आणि स्थितीनुसार खेळायचे. मग आज नाही तर उद्या निकाल आपोआप आपल्या समोर येतो”, असे हुड्डाने म्हटले.
दरम्यान या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत हुड्डाने (Deepak Hooda) विस्फोटक शतकी खेळी केली. ५७ चेंडू खेळताना १८२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने १०४ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ६ षटकार आणि ९ चौकार निघाले. अशाप्रकारे हुड्डाने आयर्लंडविरुद्ध त्याच्या टी२० आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील (First Century In Career) पहिले शतक ठोकले.
तसेच टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून शतक करणाराही हुड्डा चौथा खेळाडू ठरला आहे. भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत सर्वात पहिले नाव माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याचे आहे. दुसऱ्या क्रमांकावर सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल (KL Rahul) आहे, जो आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत सहभागी नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर चा कहर! आता तर थेट विराटचाच विक्रम केलाय स्वत:च्या नावावर
रोहित-राहुल नाही तर ‘ही’ जोडी भारतासाठी ठरलेय सुपरहिट! रचली सर्वात मोठी भागिदारी
टीम इंडियाचं ठरलंय! अशी असेल इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारताची ‘प्लेइंग ११’