हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मंगळवारी (२८ जून) आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना खेळला. भारतीय संघाने या सामन्यात तुफान फलंदाजी केली आणि दोनशे पेक्षा मोठे लक्ष्य उभे केले. यामध्ये दीपक हुड्डाच्या शतकी खेळीचे महत्वाचे योगदान राहिले. हुड्डा भारतासाठी टी-२० शतक करणारा चौथा खेळाडू ठरला आणि त्याने केलेले हे शतक देखील भारतासाठी केले गेले चौथे सर्वात वेगवान टी-२० शतकही ठरले.
आयर्लंडविरुद्धच्या या टी-२० सामन्यात दीपक हुड्डा (Deepak Hooda) एकूण ५७ चेंडू खेळला आणि १८२.४५ च्या स्ट्राईक रेटने १०४ धावा केल्या. यामध्ये ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. हुड्डाने शतक करण्यासाठी अवघे ५५ चेंडू घेतले. हे भारतीय संघाच्या इतिहासातील चौथे सर्वात वेगवान शतक ठरले. सलामीवीर संजू समॅमसन (७७) आणि हुड्डाच्या धमाकेदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसनावर २२५ धावा केल्या.
भारतासाठी सर्वात वेगवान टी-२० शतक ठोकले आहे सध्याचा संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने. रोहितने २०१७ साली श्रीलंकेविरुद्धच्या एका टी-२० सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतक पूर्ण केले होते, जे आजही संघाशाठी केले गेलेले सर्वात वेगवान टी-२० शतक आहे. त्यानंतर संघासाठी दुसरे आणि तिसरे सर्वात वेगवान शतक केएल राहुल (KL Rahul) याच्या नावावर आहे.
राहुलने वेस्ट इंडीजविरुद्ध २०१६ मध्ये अवघ्या ४६ चेंडूत, तर इंग्लंडविरुद्ध २०१८ मध्ये अवघ्या ५३ चेंडूत शतक ठोकले होते. ही दोन्ही शतके भारतासाठी केली गेलेली दोन आणि तीन क्रमांकाची वेगवान शतक आहेत. यादीत चौथ्या क्रमांकावर हुड्डा नव्याने सहभागी झाला आहे, तर पाचव्या क्रमांकावर पुन्हा एकदा रोहित शर्मा आहे. रोहितने २०१८ साली इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात ५६ चेंडूत स्वतःचे शतक ठोकले होते.
भारतीय संघासाठी शर्वात वेगवान टी-२० शतक करणारे खेळाडू
३५ चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका (२०१७)
४६ चेंडू – केएल राहुल विरुद्ध वेस्ट इंडीज (२०१६)
५३ चेंडू – केएल राहुल विरुद्ध इंग्लंड (२०१८)
५५ चेंडू – दीपक हुड्डा विरुद्ध आयर्लंड (२०२२)
५६ चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध इंग्लंड (२०१८)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एक आक्रमक तर दुसरा शांत, ‘या’ ३ गोष्टी राहुल द्रविड आणि ब्रेंडन मॅक्क्यूलमला करतात वेगळ्या
दीपक हुड्डाचे शतक, संजू सॅमसनची वादळी खेळी; भारताचे आयर्लंडसमोर २२८ धावांचे भलेमोठे आव्हान