---Advertisement---

नर्व्हस नायंटीजचा शिकार झाला असता हुड्डा; कसा वाचला सामन्यानंतर सांगितले मित्राला

On: गुरूवार, जून 30, 2022 8:24 AM
---Advertisement---

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने पुन्हा एकदा महत्वपूर्ण खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. हा सामना भारताने ४ धावांनी जिंकत मालिका २-० अशी खिशात घातली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली आहे. कारकिर्दीतील केवळ पाचवा टी२० सामना खेळत असलेल्या हुड्डाची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली आणि त्याने शानदार शतक नोंदवले. पहिल्या सामन्यात सलामीला फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून हे शतक निघाले. या डावामध्ये तोही नर्व्हस नायंटीजचा शिकार झाला असता, हे खुद्द हुड्डानेच कबूल केले आहे.

हा सामना झाल्यानंतर सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार पटकावलेल्या हुड्डाने संघसहकारी आणि मित्र संजू सॅमसन याच्याशी चर्चा केलेल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेयर केला आहे. यामध्ये हुड्डा म्हणाला, “देशासाठी शतक करणे ही नेहमीच खास असते, आणि त्यात संघ जिंकला तर ते शतक अजून विशेष होते. मात्र मी एक गोष्ट कबूल करेल, ती म्हणजे शतकाच्या जवळ पोहोचलो असता मी नर्व्हस झालो होतो. पण आज माझा दिवस होता आणि शतक पूर्ण झाले.”

https://twitter.com/BCCI/status/1542050662418042880?s=20&t=iwxk-CHZAPLHfoCT1Vx6_w

या सामन्यात पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत सलामीवीर संजूने ७७ धावांची खेळी केली. इशान किशन लवकर बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हुड्डाने ५७ चेंडू खेळताना १८२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत १०४ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ६ षटकार आणि ९ चौकार निघाले. अशाप्रकारे हुड्डाने आयर्लंडविरुद्ध त्याच्या टी२० आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील (First Century In Career) पहिले शतक ठोकले. यामुळे भारताने २० षटकात ७ विकेट्स गमावत २२५ धावांचा डोंगर रचला होता. त्याच्या प्रत्युत्तरात आयर्लंडच्या सलामीवीरांनीही धडाकेबाज सुरूवात करत भारताला कोडींत आणले होते. पॉल स्टर्लिंग आणि कर्णधार अँड्रयू बालबर्नी यांनी प्रत्येकी ४० आणि ६० धावा केल्या होत्या.

भारताच्या गोलंदाजांनी हार न  मानता संघर्ष सुरूच ठेवला. उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने टाकलेले १८वे षटक निर्णायक ठरले. या षटकात त्याने ७ धावा देत एक विकेटही घेतली होती. नंतर उमरान मलिकने २०वे षटक टाकले असता शेवटच्या दोन चेंडूत कमी धावा देत संघाचा विजय पक्का केला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ठरलंय! भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये आता हार्दिक पंड्याच कॅप्टन, खुद्द बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेच केले स्पष्ट

मोईन अलीने टाकली बीसीसीआयसमोर फिरकी! म्हणाला ‘भारताचे नेतृत्व पुन्हा विराट कोहलीकडे द्यायला हवे’

एका सामन्यात चांगली खेळी, थेट आयसीसी क्रमवारीत लांब उडी! वाचा हुड्डा अन् सॅमसन रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---