वेस्ट इंडिज संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय (Indian team for series Against West Indies) संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) पुनरागमन होणार आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येईल. तसेच या संघात काही युवा खेळाडू देखील आहेत. ज्यांना या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्यापैकीच एक नाव म्हणजे दीपक हुड्डा (Deepak hooda) देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपक हुड्डाबद्दल माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने (Irfan Pathan) एक मोठा खुलासा आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हाला दीपक हुड्डाचे क्रिकेटवर किती प्रेम आहे याचा अंदाज येईल.
दीपक हुड्डाची २०१७ मध्ये भारतीय टी२० संघात निवड झाली होती. परंतु त्यावेळी त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याने आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स संघाकडून खेळताना अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच दीपक हुड्डा आणखी एका कारणामुळे चर्चेत आला होता. बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करत असताना, त्याचा कृणाल पंड्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर त्याने हा संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. ६ महिन्यानंतर त्याने राजस्थान संघात प्रवेश केला.
राजस्थान संघात समाविष्ट होताच त्याचे क्रिकेटवर असलेले प्रेम दिसून आले होते. ज्याची ग्वाही स्वतः राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे सचिव महेंद्र शर्मा यांनी दिली आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “त्याला फक्त खेळायचे होते. व्यावसायिक खेळाडू मानधनाबद्दल बोलतात तसे त्याने कधीच केले नाही. तो कोणत्या प्रकारच्या परिस्थितीतून येत आहे हे आम्हाला माहीत होते. आमच्या दोघांसाठी ही विजयाची परिस्थिती होती. आम्हाला त्याच्यासारख्या अष्टपैलू फलंदाजाची गरज आहे, जो स्थानिक खेळाडूंनाही मार्गदर्शन करू शकेल.”
तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने याबाबत दीपक हुड्डाची भारतीय संघात निवड झाल्यानंतर म्हटले की, “तुम्हाला मध्यक्रमातील फलंदाजाकडून काय अपेक्षित आहे, त्याने स्ट्राइक रोटेट करावं? तो सतत एक किंवा दोन धावा काढू शकतो का? हो, तो तसं करू शकतो. तो लेग साईडला खूप चांगला खेळतो. आता त्याने ऑफ साईडच्या खेळात देखील भरपूर सुधारणा केली आहे. तो जलद गतीने फलंदाजी करू शकतो का? तर हो, त्याच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची देखील क्षमता आहे.”
दीपक हुड्डा उत्कृष्ट फलंदाजीसह अप्रतिम गोलंदाजी देखील करतो. तो ऑफ स्पिन गोलंदाज आहे. याबाबत बोलताना इरफान पठाण म्हणाला की, “सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. तसेच पावरप्लेच्या षटकांमध्ये नव्या चेंडूने गोलंदाजी देखील करू शकतो. तसेच जुन्या चेंडूने देखील गोलंदाजी करू शकतो.”
महत्वाच्या बातम्या :
आगामी विश्वचषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, महत्वाच्या फलंदाजाची टी२० मधून ६ महिन्यांसाठी विश्रांती
कर्णधार रोहितला थोडाही नाही आवडला ‘हा’ खेळाडू! फक्त २ सामने खेळवून केली वनडेतून हाकालपट्टी
हे नक्की पाहा: