---Advertisement---

ऑस्ट्रेलियावर भारी पडली दीप्ती, आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला विक्रम केला नावावर

On: शनिवार, डिसेंबर 30, 2023 6:40 PM
Deepti Sharma
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शनिवारी (30 डिसेंबर) भारताने ऑस्ट्रेलियाला 258 धावांवर रोखले. फिबी लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. पण दीप्ती शर्माच्या फिरकीमुळे ऑस्ट्रेलियाला निर्धारित धावसंख्येवर समाधान मानावे लागले. दीप्तीने घेतलेल्या पाच विकेट्सच्या जोरावर तिने एक मोठा विक्रम नावावर केला.

दीप्ती शर्मा (Deepti Sharma) मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाची महत्वाची खेळाडू बनली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये तिने संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. शनिवारी (30 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दीप्तीने 10 षटकांमध्ये 38 धावा खर्च करून 5 विकेट्स नावावर केल्या. या विकेट्स नक्कीच भारतीय संघासाठी महत्वाच्या होत्याच, पण दीप्तीसाठीही खास ठरल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये विकेट्सचे पंचक नावावर करणारी दीप्ती ही पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे. यापूर्वी एकही भारतीय महिला खेळाडू वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका सामन्यात पाच विकेट्स घेऊ शकली नव्हती.

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून दीप्तीचा फॉर्म अधिकच उंचावल्याचे दिसले आहे. डिसेंबर महिन्यातच इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघांत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत (14 डिसेंबर) दीप्तीने पहिल्या डावात 5, तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, उभय संघांतील हा दुसरा वनडे सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासाठी फिबी लिचफिल्ड हिने 63, तर एलिस पेरी हिने 50 धावांचे योगदान दिले. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियासाठी एकही खेळाडू या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. भारतासाठी दीप्तीच्या पाच विकेट्स सोडल्या, तर पूजा वस्त्राकर, श्रेयांका पाटील आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Deepti Sharma becomes the FIRST ever Indian woman to take a fifer in ODIs against Australia.)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, स्नेह राणा, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, पूजा वस्त्राकर.

ऑस्ट्रेलिया – एलिसा हिली, फिबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, थासला मॅकग्रा, एशले गार्डनर, एनाबेल सदरलँड, जाॅर्जिया वेयरहम, अलाना किंग, किम गार्थ, डार्सी ब्राऊन

महत्वाच्या बातम्या – 
IND vs AUS । ऑस्ट्रेलियासाठी वरच्या फळीतील फलंदाजांची अर्धशतके, दीप्ती शर्माचे विकेट्सचे पंचक
रोहित-रितिकाने मुलगी समायराचा वाढदिवस साजरा केला हटके अंदाजात; दिलं मोठं सरप्राईज, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---