---Advertisement---

दिप्ती शर्माची जगमोहन दालमिया “बेस्ट वूमन क्रिकेटर ऑफ द इयर” पुरस्कारासाठी निवड

On: गुरूवार, जून 7, 2018 7:41 PM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडु दिप्ती शर्माची २०१७-१८ च्या मोसमासाठी जगमोहन दालमिया  पुरस्कारासाठी “बेस्ट वूमन क्रिकेटर ऑफ द इयर” (वरिष्ट देशांर्तगत क्रिकेटसाठी) म्हणून निवड करण्यात आली आहे.

बीसीसीआयने नामांकनाबाबत क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालला (कॅब) माहिती दिली आहे. दिप्ती बंगालकडून देशांर्तगत क्रिकेट खेळते.

ट्रॉफी आणि दीड लाख रूपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.  बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा १२ जुनला बंगळुरूमध्ये पार पडणार आहे. यामध्ये तीला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

य़ंदाच्या आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट खेळपट्टी आणि मैदानाचा पुरस्कार ईडन गार्डनला मिळाला. बंगाल क्रिकेट योग्य दिशेने जात आहे असे यावेळी कॅबचे सहसचिव अविषेक दालमिया म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment