भारतीय महिला संघाने नुकतेच इंग्लंड दौऱ्यात धमाकेदार प्रदर्शन केले. पाहुण्या भारतीय संघाने यजमान इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप (0-3) दिला. शेवटच्या सामन्यातील शेवटची विकेट दिप्ती शर्मा हिने ज्या पद्धतीने घेतली, त्यावरून सध्या वाद सुरू आहे. इंग्लंडची चार्ली डीनला विकेट गमावल्यानंतर मैदानात अश्रू अनावर झाले. दिप्ती शर्माने जरी नियमात राहून ही विकेट मिळवली असली, तरी अनेकजण तिच्यावर टीका करत आहेत. आता भारताच्या या अष्टपैलू खेळाडूने स्वतः याबाबतीत प्रतिक्रिया दिली आहे.
दिप्ती शर्माने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाकडून चार्ली डीनला आधीच सुचना दिली गेली होती. पण तरीदेखील ती गोलंदाजाने चेंडू टाकायच्या आधीच क्रीजच्या पुढे जात होती. अंघाने सांगून देखील तिने ऐकले नाही आणि परिणाणी तिला विकेट गमवावी लागली. इंग्लंड संघ लक्ष्याचा पाठलाग करत असताना 44 व्या षटकात हा प्रकार घडला. दिप्ती शर्मा (Deepti Sharma) या षटकात गोलंदाजी करत होती. षटकातील तिसऱ्या चेंडूवर चार्ली डीन (Charlie Dean) पुन्हा एकदा क्रीज सोडून पुढे गेली. ऐन वेळी दिप्तीने चेंड टाकण्याऐवजी हातातच ठेवला आणि माघारी वळून स्टंप्सला लावला. परिणाणी इंग्लंडने त्यांची शेवटची विकेट गमावली आणि हातात आलेला सामना गमावली.
अष्टपैलू दिप्ती शर्माने भारतात पोहोचल्यानंतर स्वतः या प्रकाराविषयी स्पष्टीकरण दिले आहे. तिने सांगितल्याप्रमाणे हे सर्व संघाने आधीच ठरवले होते, कारण नॉन स्ट्राईकवरील डीन सतत क्रीज सोडून पुढे जात होती. दिप्ती म्हणाली की, “हा आमच्या प्लॅनचा भाग होता, कारण आम्ही आधीच तिला चेतावणी दिली होती. पण तरीही ती सतत ही चूक करतच होती. आम्ही जे काही केले, ते नियमात होते. आम्ही पंचांनी देखील याविषयी आधीच सांगितले होते.”
भारताने या सामन्यात 16 धावांच्या अंतराने विजय मिळवला. तसे पाहिले तर इंग्लंड शेवटच्या 6 षटकांमध्ये या धावा सहच करू शकत होता. शेवटच्या विकेटसाठी त्यांच्या खेळाडूंनी चांगली भागीदारी देखील केली होती. पण फलंदाजी गाफील राहिल्यामुळे त्यांना हातातोंडाला आलेला सामना गमवावा लागला. पराभवानंतर इंग्लंडच्या सर्व खेळाडू खूपच निराश दिसत होत्या. डीनने या सामन्यात 80 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रेकॉर्ड अर्लट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भन्नाट खेळणाऱ्या किंग कोहलीचा विक्रम, ठरला केवळ दुसराच क्रिकेटपटू
ऑस्ट्रेलियानंतर भारत आता दक्षिण आफ्रिकेचा घाम काढणार! पाहा वेळापत्रक आणि हेड-टू-हेड रेकॉर्ड्स
छत्तीसगड इंटरनॅशनल चॅलेंजमध्ये तसनीम आणि प्रियांशूने एकेरीचे विजेतेपद पटकावले