---Advertisement---

सूर्यकुमार यादववर आरोप करणं खुशी मुखर्जीला पडलं महागात! 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल

On: मंगळवार, जानेवारी 13, 2026 10:31 PM
---Advertisement---

भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यावर 2025 च्या शेवटी मॉडेल खुशी मुखर्जीने गंभीर आरोप केले होते. सूर्या तिला मेसेज करायचा, असा दावा तिने केला होता. या प्रकरणावर सूर्यकुमारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आता हे प्रकरण खुशी मुखर्जीवरच उलटले आहे. सूर्याच्या एका चाहत्याने तिच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे राहणाऱ्या फैजान अंसारी नावाच्या चाहत्याने खुशी मुखर्जीविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. खुशीचे आरोप खोटे असून यामुळे सूर्यकुमारची प्रतिमा मशिद झाली आहे, असे अंसारीचे म्हणणे आहे. फैजान अंसारीने गाझीपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे (SP) या मॉडेलला अटक करण्याची मागणीही केली आहे.

रिपोर्टनुसार, आता हे कायदेशीर प्रकरण अंगाशी येताच खुशी मुखर्जी माफी मागून हा वाद संपवण्याच्या प्रयत्नात आहे. तिने यापूर्वी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले होते, पण चाहत्यांचे समाधान झालेले नाही.

एकीकडे हा वाद सुरू असताना, दुसरीकडे सूर्यकुमार यादव मोठ्या आयसीसी (ICC) स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. गेल्या काही सामन्यांत त्याची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही, त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध 21 जानेवारीपासून 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेत मोठी धावसंख्या उभारून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतण्याचे मोठे आव्हान सूर्यासमोर असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---