गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईमध्ये आयपीएल २०२१ साठी लिलाव पार पडला. या लिलावाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना मोठ्या बोली लागल्या. असे असले तरी या लिलावादरम्यान चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीच्या सदस्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
चेन्नईच्या सदस्यांनी वेधले लक्ष
या लिलावासाठी आलेल्या चेन्नईच्या सदस्यांच्या टी-शर्टवर ‘डेफिनेटली नॉट’ (निश्चितच नाही) असे लिहिले होते. त्याचे झाले असे की मागील हंगामातील शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यादरम्यान चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला कॉमेंटेटर डैनी मॉरिसनने विचारले होते की तो आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत आहे का? या वेळी धोनीने ‘डेफिनेटली नॉट’ (निश्चितच नाही) असे उत्तर दिले होते.
यामुळेच यंदा लिलावाच्या वेळी चेन्नईच्या सदस्यांच्या टी-शर्टवर हेच वाक्य लिहले होते. तसेच सर्वांनी ७ क्रमांक लिहिलेला मास्क देखील लावला होता. ७ हा धोनीचा जर्सी क्रमांक आहे.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1362322468652818436
मागच्या हंगामात निराशाजनक कामगिरी
आयपीएलच्या सुरुवातीपासूनच धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघाला २०२० च्या आयपीएल हंगामात पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये पोहोचण्यात अपयश आले होते. चेन्नई संघाकडे सर्वात जास्त वेळेस आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याचा अनुभव आहे. तसेच मुंबई इंडियन्स नंतर चेन्नई सुपर किंग्स हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलाव २०२१: दहा खेळाडूंवर लागली ५ कोटींपेक्षा अधिक रकमेची बोली; जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू
आयपीएल लिलाव २०२१: कोणावर सर्वाधिक बोली; तर कोण राहिलं अनसोल्ड, वाचा एकाच क्लिकवर सर्वकाही
आयपीएल लिलाव : अखेर केदार आणि हरभजन यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले; या संघांमध्ये झाले सामील






