इंडियन प्रीमीयर लीग २०२२ ला आता कोरोनाचा धक्का बसत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे की, दिल्ली कॅपिटल्स संघातील दुसरा परदेशी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वी मिशेल मार्शचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच त्याच्याव्यतिरिक्त अन्य ४ सदस्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
माध्यमांतील वृत्तानुसार दिल्ली संघातील टीम सिफर्ट याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता बुधवारी (२० एप्रिल) होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीच दिल्लीच्या गोटात कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे सापडल्याने संघाचे पुण्याला जाणे रद्द करण्यात आले होते.
तसेच दिल्ली आणि पंजाब (Delhi Capitals vs Punjab Kings) संघातील पुण्यात होणारा सामना मुंबईला ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) हलवण्यात आला आहे. पण आता या सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सामन्यापूर्वी खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट होणार होती. त्या टेस्टमध्येच सिफर्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे समजत आहे. आता जर सामना बुधवारी खेळवण्यात आला नाही, तर पुढे ढकलला जाऊ शकतो. (Delhi Capitals Another overseas player tests positive for Covid-19)
दिल्लीचे हे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
सोमवारी (१८ एप्रिल) समोर आलेल्या वृत्तानुसार दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श याचा कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आलेली असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच दिल्लीचे अन्य काही सदस्यही कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये दिल्लीचे (Delhi Capitals) फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट, स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, टीम डॉक्टर अभिजीत सालवी आणि सोशल मीडिया सदस्य आकाश माने यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे दिल्लीचे अन्य खेळाडू आणि सदस्य क्वारंटाईन आहेत आणि खेळाडूंना मुंबईतच सराव करण्यास सांगितला आहे. तसेच त्यांची रोज १६ एप्रिलपासून आरटी पीसीआर टेस्ट होत आहे.
दिल्ली संघाची हंगामातील कामगिरी
दिल्ली संघाने या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहे. यापैकी फक्त २ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. उर्वरित ३ सामन्यात त्यांनी पराभवाचा सामना केलाय.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराटने आता विश्रांती घ्यावी’, केवळ रवी शास्त्रीच नाही, तर ‘या’ दिग्गजाचाही सल्ला
विकेट गमावताच स्टॉयनिसची शिवीगाळ स्टंपमाईकमध्ये कैद, पाहा हेजलवुडच्या षटकात काय घडले
‘त्याने दाखवून दिले लेगस्पिनर मॅचविनर असतात’, मलिंगाकडून भारतीय गोलंदाजाचे तोंडभरून कौतुक