भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मागील काही काळापूर्वी त्याच्या यष्टीरक्षणाच्या कौशल्यावरून टीका केली जात होती. मात्र, आता या धडाकेबाज खेळाडूने आपल्या कौशल्यात आणखी सुधारणा करत आपली दखल सर्वांना घ्यायला लावतोय. अशीच एक घटना सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२२मधील ४१व्या सामन्यात घडली. यावरून पंत त्याच्या खेळाप्रती किती समर्पित आहे, हे दिसून येते. यादरम्यानचा व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे.
गुरुवारी (दि. २८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ आमने- सामने होते. यादरम्यान नाणेफेक जिंकून कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, कोलकाताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी कोलकाताने ३५ धावांवरच आपल्या ४ विकेट्स गमावल्या होत्या.
मात्र, कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि नितीश राणाने (Nitish Rana) एका बाजूने धावफलक हलता ठेवला. ते आपल्या संघाला धावा काढून देण्यात मग्न होते. दोघांनीही ४८ धावांची भागीदारी रचली होती. त्यावेळी दिल्लीकडून चौदावे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव आला. यावेळी ४२ धावांवर खेळत असलेला श्रेयस फलंदाजी करत होता. मात्र, चौदाव्या षटकातील कुलदीपच्या पहिल्याच चेंडूवर श्रेयस झेलबाद झाला. कुलदीपच्या या विकेटचे श्रेय हे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला जाते. कारण, त्याने श्रेयसच्या बॅटच्या आतील बाजूला लागलेला चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच चित्त्याच्या वेगाने झेल घेतला. यामुळे श्रेयसला तंबूत परतावे लागले.
https://twitter.com/Peep_at_me/status/1519697979396935683?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519697979396935683%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Frishabh-pant-catch-dc-vs-kkr-ipl%2F
https://twitter.com/krishnaa_ti/status/1519696820259409926?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519696820259409926%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-rishabh-pant-showed-amazing-like-ms-dhoni-shreyas-iyer-was-shocked-video-went-viral-4222571.html
हा कठीण झेल घेतल्यानंतर पंतचा तोल गेला आणि तो जमिनीवर बसला. श्रेयसलाही यावर विश्वास बसला नाही. त्यावेळी पंतने चेंडू व्यवस्थित पकडला आहे की, नाही याचा पंचांना संशय आल्यानंतर त्यांनी रिप्लेमध्ये पाहिले. यामध्ये स्पष्टपणे दिसले की, पंतने स्पष्टरीत्या हा झेल घेतला होता.