दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ३२ वा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ ११५ धावांवरच सर्वबाद झाला. दिल्लीने पंजाबच्या ११६ धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. त्यांनी १०.३ षटकांमध्येच एका विकेटच्या नुकसानावर ११९ धावा करत ९ विकेट्सने हा सामना जिंकला. या मोठ्या विजयासह दिल्लीने इतिहास रचला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने रचला इतिहास
१०० पेक्षा जास्त धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेऊन सामना जिंकण्याचा पराक्रम दिल्लीने (Delhi Capitals) केला आहे. दिल्ली संघाने ५७ चेंडू शिल्लक असताना पंजाबवर मात केली आहे. यासह त्यांनी डेक्कन चार्जर्स हैदराबादचा विक्रमही मोडला आहे. यापूर्वी डेक्कन संघाने २००८ मध्ये ४८ चेंडू शिल्लक असताना १५५ धावांचे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांनी हा पराक्रम केला होता.
१००पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून विजय:
५७ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज २०२२ (लक्ष्य ११६)
४८ – डेक्कन चार्जर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स २००८ (लक्ष्य ११५)
४६ – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज २०२० (लक्ष्य ११५)
पंजाब किंग्जच्या नावावर नकोशी कामगिरी
याखेरीज पंजाबचा (Punjab Kings) संघ ११५ धावांवर सर्वबाद झाल्याने त्यांच्या नावे या हंगामातील सर्वात कमी धावसंख्येची नोंद झाली आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघ पंजाबविरुद्ध १२६ धावांवरच गुंडाळला गेला होता. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १२८ धावाच करता आला होत्या.
आयपीएल २०२२मध्ये सर्वात निच्चांकी धावसंख्या:
११५ – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ब्रेबॉर्न
१२६ – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज, ब्रेबॉर्न
१२८ – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, डीवाय पाटील
१३१/५ – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, वानखेडे
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सचे खेळाडू मधमाशांसमोर हतबल, सरावादरम्यान झोपावं लागलं मैदानात, Video व्हायरल
दिल्ली संघात कोरोनाचा फैलाव होण्यास डॉक्टर कारणीभूत? ‘या’ कारणाने निर्माण झाले प्रश्न
जिंकलस भावा! कुलदीपने सामनावीर पुरस्कार केला अक्षर पटेलबरोबर शेअर, कारणही सांगितलं