भारतातील इंडियन प्रीमियर लीग ही अशी स्पर्धा आहे. जिथे सर्व भारतीय खेळाडूंना खेळण्याची इच्छा असते. काही खेळाडूंना आपल्या कौशल्यामुळे खेळण्याची संधी देखील मिळते. तर काहींना संधी मिळूनही वाढत्या स्पर्धेमुळे खेळण्याच्या संधीला मुकावे लागते. आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक नवीन खेळाडू येतात जे आपल्या खेळाने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. असाच एक खेळाडू म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलेला तुषार देशपांडे.
देशपांडेने हा जलदगती गोलंदाज आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून गेल्यावर्षी ५ सामने खेळले होते. ज्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र दिल्लीच्या संघाने आयपीएलच्या १४ व्या हंगामात देशपांडेला पुन्हा संघात कायम केले नाही. त्यामुळे दिल्लीच्या या निर्णयावर देशपांडे चांगलाच निराश झाला. दिल्लीने देशपांडे ऐवजी ईशांत शर्मा आणि हर्षल पटेल यांना संधी दिली.
दरम्यान, याबाबत एका यूट्यूब चॅनल ‘बिहाईंड द स्टंप्स विद अनुज’ वर बोलताना देशपांडे म्हणाला, “संघात न घेतल्यामुळे मी निराश झालो होतो. कारण मी खराब प्रदर्शन देखील केले नव्हते. ज्यामुळे मला संघ काढून टाकेल. हा, एखादा सामना खराब राहिला असेल, पण यामुळे आपण खराब गोलंदाज होऊ शकत नाही. ज्यामुळे मला संघातून काढून टाकण्यात यावे.”
“माझ्या मॅनेजरने मला फोन करून संघात पुन्हा न घेतल्याची माहिती दिली होती. यानंतर मी निराश झालो होतो. मात्र मी स्वतःला यातून सावरले. परंतु, मला दिल्ली कॅपिटल्स कडून जी काही संधी मिळाली, त्यामध्ये मी खुश आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”
दरम्यान, पुढील वर्षी आयपीएल २०२२ साठी मोठा लिलाव होणार आहे, ज्यात देशपांडे देखील सहभाग नोंदवणार आहे. याबाबत बोलताना देशपांडे म्हणाला, “जर मी मुंबई इंडियन्सकडून खेळलो तर, हे माझ्यासाठी खूप चांगले राहील. कारण ५ वेळा चषक जिंकणाऱ्या; तसेच मी ज्या भागातून येतो त्या भागातील संघाकडून खेळणे, हे कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच या संघामध्ये रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, सूर्यकुमार यादव यांसारख्या खेळाडूंसोबत खेळणे हे माझ्यासाठी अनुभव देणारे राहील. त्यामुळे मुंबई इंडियन्ससारख्या संघाकडून खेळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल.”
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने अत्यंत काळजीपूर्वक आयपीएल २०२१चे नियोजन केले होते. तरीही आयपीएल २०२१मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. ज्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे १४ वे हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करावे लागले. ज्यानंतर बीसीसीआयने उर्वरित आयपीएल २०२१ चे सामने यूएईमध्ये करणार असल्याचे स्पष्ट केले होते. आयपीएलच्या उर्वरित टप्प्यातील पहिला सामना यूएईमध्ये १९ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. उर्वरित टप्प्यात पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ एकमेकांसोबत भिडणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–बिग ब्रेकिंग! टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक घोषित; ‘या’ दिवशी होणार भारताचे सामने
–सिराजची विक्रमी कामगिरी! लॉर्ड्सवर ३९ वर्षांपूर्वी कपिल देवच्या ‘त्या’ पराक्रमाची केली बरोबरी
–आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात अफगाणिस्तानचे खेळाडू सहभागी होणार का? ‘ही’ माहिती आली समोर