शनिवारी (दि. १६ एप्रिल) आयपीएल २०२२मधील २७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे. डबल हेडरमधील हा दुसरा सामना सायंकाळी ७.३०वाजता होणार आहे. तत्पूर्वी या सामन्यान नाणेफेक पार पडली. यामध्ये दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवून गुणतालिकेतील आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यात दिल्ली (Delhi Capitals) संघाचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) मिचेश मार्शला संघाची कॅप सोपवलीये. मिचेलने सर्फराज खानची जागा घेतलीये. दुसरीकडे, बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात हर्षल पटेलची एन्ट्री झालीये. हर्षलने आकाश दीपची जागा घेतलीये.
🚨 Toss Update from Wankhede 🚨@DelhiCapitals have elected to bowl against @RCBTweets.
Follow the match 👉 https://t.co/Kp3DueRxD0#TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/2mcASylgKe
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2022
आमने- सामने कामगिरी
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वरचढ ठरला आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात बेंगलोरने १६ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे दिल्ली संघाने बेंगलोरविरुद्ध १० सामने जिंकले आहेत.
A look at the Playing XIs 🔽
Follow the match 👉 https://t.co/Kp3DueRxD0#TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/tToC2O3eJK
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2022
यंदाच्या हंगामातील कामगिरी
बेंगलोर संघाने या हंगामात ५ सामने खेळले असून त्यात त्यांनी ३ सामन्यात विजय, तर २ सामन्यात पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, दिल्ली संघाने ४ सामने खेळले आहेत. त्यातील २ सामन्यात त्यांनी विजय मिळवलाय, तर उर्वरित २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रहमान आणि खलील अहमद.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड आणि मोहम्मद सिराज.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्ससाठी काय पण! टीम संघर्ष करत असताना सूर्यकुमारची लक्षवेधी प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला
‘गब्बर’ने लावले कॅप्टन मयंक अन् रबाडासह झक्कास ठुमके; भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूची आली कमेंट