इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला मागील काही दिवसांपासून कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे. आधीच संघातील महत्त्वाचे २ खेळाडू टीम सेफर्ट आणि मिशेल मार्श कोरोनाग्रस्त झाले असताना संघासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग हे शुक्रवारी (दि. २२ एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या आयपीएलच्या ३४वा सामन्यात संघासोबत नसतील. (Delhi Capitals Head Coach Ricky Ponting Family Member Has Tested Positive For COVID-19)
यामागील कारण म्हणजे, पाँटिंग यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंब विलगीकरणात असून संघाच्या हॉटेलमध्येच थांबणार आहे. दिल्ली संघाचे संपूर्ण खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबातील सदस्य यांची गुरुवारी (दि. २१ एप्रिल) आणि शुक्रवारी (दि. २२ एप्रिल) आरटी- पीसीआर चाचणी केली गेली. दिल्लीकडून याबद्दल अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यात ते असे म्हणालेत की, “दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या कुटुंबातील सदस्याची कोव्हिड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कुटुंबाला आता विलगीकरणात हलवण्यात आले आहे आणि त्यांची काळजी घेतली जात आहे.”
OFFICIAL STATEMENT:
A family member of Delhi Capitals Head Coach Ricky Ponting has tested positive for COVID-19. The family has now been moved into an isolation facility and is being well taken care of. pic.twitter.com/FrQXjlSYRI
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022
दिल्लीची आयपीएल २०२२मधील कामगिरी
दिल्ली संघाच्या आयपीएल २०२२मधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ३ सामन्यात विजय आणि ३ सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात दिल्ली संघ विजय मिळवून अव्वल ५ संघांमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.
रिकी पाँटिंग यांची आयपीएल कारकीर्द
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारे रिकी पाँटिंग यांना आयपीएलमध्ये फार सामने खेळता आले नाहीत. त्यांनी आतापर्यंत फक्त १० आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी १०.११च्या सरासरीने फक्त ९१ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहित-विराटची विकेट घेणारा कोण आहे मुकेश चौधरी? महाराष्ट्र संघासाठीही केलीय दमदार कामगिरी
मुंबई इंडियन्सच्या चुकांवर सचिनच्या शब्दांचे पांघरुण; म्हणतोय, ‘युवा संघ आहे, चुकांमधून…’