---Advertisement---

अफलातून! रहाणेला तंबूत पाठवताना ललितने टिपला जबरदस्त ‘कॉट & बोल्ड’, व्हिडिओ पाहाच

On: बुधवार, मे 10, 2023 9:23 PM
Lalit-Yadav-And-Ajinkya-Rahane
---Advertisement---

बुधवारी (दि. 10 मे) आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई प्रथम फलंदाजी करत असताना त्यांचा चांगला फॉर्ममध्ये असलेला फलंदाज अजिंक्य रहाणे याला बाद करताना ललित यादव याने स्वतःच्याच गोलंदाजीवर एक अप्रतिम झेल टिपला.

या सामन्यात चेन्नईला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. धावफलकावर केवळ 64 धावा असताना ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे व मोईन अली हे बाद झाले होते. अशा स्थितीत अजिंक्य रहाणे संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी बारावे षटक टाकण्यासाठी ललित यादव गोलंदाजीसाठी आला. हे षटक मोठे बनवण्याच्या निर्धाराने खेळत असलेल्या रहाणेने पुढे सरसावत फटका मारला.

https://twitter.com/IPL/status/1656315476518244353?t=aOG7ptN9WYXBof8X32VXuw&s=19

जमिनीलगत असलेला हा फटका चेंडू टप्पा पडण्याआधी ललित यादव याने उजवीकडे झेपावत पकडला. हा झेल स्पर्धेतील आत्तापर्यंत टिपलेल्या सर्वोत्तम झेलांपैकी एक ठरला.

चेन्नईच्या डावाचा विचार केल्यास आतापर्यंत स्पर्धेत शानदार सलामी देणाऱ्या ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांना ती कामगिरी करता आली नाही. कॉनवे केवळ 10 धावा करू शकला. तर, ऋतुराजची खेळी 24 धावांवर संपुष्टात आली. मोईन अली व अजिंक्य रहाणे अनुक्रमे 7 व 21 धावा काढून बाद झाले. त्यानंतर शिवम दुबे व अंबाती रायुडू यांनी आक्रमक 25 व‌ 23 धावा चोपल्या. अखेरच्या दोन षटकांमध्ये रवींद्र जडेजा व कर्णधार एमएस धोनी यांनी काही मोठे फटके खेळत संघाला 167 पर्यंत मजल मारून दिली.

(Delhi Capitals Lalit Yadav Took Stunning Catch Of Ajinkya Rahane)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीकाकारांना विराटचे सडेतोड प्रत्युत्तर; सांगूनच टाकले, कुणाशी आहे त्याची लढाई
सीएसकेच्या ‘या’ खेळाडूचा दिल्लीविरुद्ध भीमपराक्रम! बनला 200वा IPL सामना खेळणारा फक्त 9वा खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---