---Advertisement---

दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉवर चोरीचा आरोप! सरावादरम्यान मैदानात ठेवलेल्या पेट्यांमधून चोरली ‘ही’ गोष्ट

On: शुक्रवार, एप्रिल 15, 2022 6:48 PM
Prithvi-Shaw-Mango
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघाचा धुरंधर फलंदाज पृथ्वी शॉ या हंगामात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो आंबे चोरून खाताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सने शॉचे २ व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओत तो आयपीएल सरावादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये ठेवण्यात आलेल्या आंब्याच्या पेटीतील आंबे चोरून खाताना दिसत आहे. यादरम्यान त्याचे संघसहकारी खेळाडूंनी मजेशीर चर्चाही केली. खास गोष्ट म्हणजे शॉला यावेळी संघसहकाऱ्यांनी आंबे कसे खातात, हेही शिकवले.

व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओत पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) स्टेडिअमध्ये ठेवलेले आंबे उचलून आपल्या खिशात भरताना दिसला होता. ११ सेकंदाच्या या व्हिडिओत जेव्हा त्याला कुणीतरी रोखले, तेव्हा त्याने दुर्लक्ष केले आणि सर्व आंबे उचलले. यानंतर दुसऱ्या व्हिडिओत शॉ म्हणाला की, आंबे कापून खायला येत नाहीत. यावर संघसहकारी विचारतात की, त्याने कधी आंबे खाल्ले नाहीत का? यावर उत्तर देत शॉ काही बोलत नाही, आणि हसू लागतो. तसेच, आंब्याचा वास घेत विचारतो की, याचं काय करतायचंय? उत्तरात अष्टपैलू ललित यादव त्याला आंबा खाऊन दाखवतो. यानंतर शॉदेखील आंब्यांवर तुटून पडतो. दिल्लीने हा व्हिडिओ शेअर करत “भेटा आंबे चोरणाऱ्याला” असे कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/p/CcQHwMmN2yT/?utm_source=ig_embed&ig_rid=8de1dd59-94c6-4159-8421-c6fdc2e42bcf

आंब्याची कोय इतर खेळाडूंना देताना दिसला शॉ
आंबा खाऊन झाल्यानंतर शॉ त्याची कोय काढून त्याचा रस पिताना दिसतो. शॉच्या हातात कोय पाहून त्याला विचारले जाते की, असे हात आणि तोंड खराब करून आंबा खाऊ नये. आंब्याचा रस पिऊन शॉ संघसहकाऱ्याच्या हातात कोय देतो आणि म्हणतो की, “तू पण खाऊन घे.” हे पाहून सर्वत्र एकच हशा पिकतो.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

पृथ्वी शॉची आयपीएल २०२२मधील कामगिरी
आयपीएल २०२२मध्ये खेळताना सलग २ डावांमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ताबडतोब फलंदाजी करणाऱ्या शॉने या हंगामात ४०च्या सरासरीने १७०च्या स्ट्राईक रेटने १६० धावा केल्या आहेत. दिल्लीला प्लेऑफपर्यंतचा प्रवास करायचा असेल, तर शॉला महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---