---Advertisement---

मोठी बातमी! दिल्लीचा संपूर्ण संघ क्वारंटाईन, फिजिओनंतर एका खेळाडूलाही कोरोना; IPL कोरोनाच्या कचाट्यात?

On: सोमवार, एप्रिल 18, 2022 12:50 PM
Delhi-Capitals
---Advertisement---

भारतातील मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे सामने खेळले जात आहेत. आतापर्यंत (१७ एप्रिल) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २९ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून मोठी बातमी पुढे येत आहे.

दिल्ली कॅपिटल्सने संघातील कोविड उद्रेकाच्या भीतीने त्यांच्या आगामी सामन्यासाठी पुण्याचा आजचा (१८ एप्रिल) नियोजित प्रवास रद्द केला आहे. आज आणि उद्या नियोजित केलेल्या कोविड-१९ चाचण्यांसह दिल्लीच्या सर्व खेळाडूंना त्यांच्या खोल्यांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिल्लीचा आगामी सामना पंजाब किंग्जविरुद्ध २० एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आता काही खेळाडूंचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आढळला असल्याचे समजत आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---