रविवार (दि. 26 मार्च) हा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खूपच खास आहे. कारण, या दिवशी महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघ आमने-सामने आहेत. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर 7.30 वाजता खेळला जाणार आहे. त्यापूर्वी 7 वाजता नाणेफेक झाली. यावेळी दिल्लीने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी जबरदस्त झुंज देतील.
या सामन्यात मुंबई इंडियन्स महिला (Mumbai Indians Women) संघात कोणताही बदल झाला नाहीये. तसेच, दिल्ली कॅपिटल्स महिला (Delhi Capitals Women) संघात एक बदल झाला आहे. दिल्लीच्या पूनम यादव हिच्या जागी मिन्नू मणी हिची संघात एन्ट्री झाली आहे.
https://twitter.com/wplt20/status/1639984668954230784
https://twitter.com/DelhiCapitals/status/1639983755568852995
विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्स संघाने या स्पर्धेत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे, तर उर्वरित 2 सामन्यात त्यांनी पराभवाचा सामना केला आहे. दुसरीकडे, सर्वप्रथम अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघानेही 8 सामन्यांपैकी 6 सामन्यात बाजी मारली आहे, तर 2 सामन्यात पराभव पत्करला आहे. आता अंंतिम सामन्यात कोण कोणावर भारी पडतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Delhi Capitals Women won the toss and opt to bat first against Mumbai Indians Women in wpl final)
डब्ल्यूपीएल अंतिम सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
मुंबई इंडियन्स संघ-
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इझी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक
https://twitter.com/DelhiCapitals/status/1639985050300346368
दिल्ली कॅपिटल्स संघ-
मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिझाने केप, एलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, मिन्नू मणी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दोन खेळाडूंनी चपळाई दाखवत पकडला अविश्वसनीय झेल, पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटे, व्हिडिओ व्हायरल
‘फायनल खेळण्याची संधी दररोज मिळत नाही…’, WPL 2023च्या फायनलपूर्वी रोहितचा हरमनसेनेला खास संदेश






