---Advertisement---

दिल्लीचा दमदार कमबॅक! कोलकाताला ४ विकेट्सने धूळ चारत मिळवला दणदणीत विजय; रोवमन पॉवेल विजयाचा हिरो

DC-vs-KKR
---Advertisement---

गुरुवारी (दि. २८ एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४१वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. हा दिल्लीचा हंगामातील चौथा विजय होता. या विजयाचा शिल्पकार रोवमन पॉवेल ठरला. पॉवेलने विजयी षटकार लगावत दिल्लीला सामना जिंकून दिला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार कुलदीप यादवला देण्यात आला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी कोलकाताने फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत १४६ धावा चोपल्या. कोलकाताच्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने ६ विकेट्स गमावत १९व्या षटकातच ४ विकेट्सने सामना खिशात घातला.

https://twitter.com/IPL/status/1519734477102141440

दिल्लीकडून फलंदाजी करताना डेविड वॉर्नरने (David Warner) सर्वाधिक धावा केल्या. त्याने २६ चेंडूंचा सामना करताना ४२ धावा केल्या. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त रोवमन पॉवेलने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे, विजयी षटकार खेचत सामनाही त्यानेच जिंकून दिला. तसेच, अक्षर पटेलने २४ आणि ललित यादवने २२ धावा केल्या होत्या.

यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना उमेश यादवने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त हर्षित राणा आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना ५७ धावा केल्या. यामध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) ३७ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार मारत ४२ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त फक्त रिंकू सिंगला २३ धावा करता आल्या. इतर एकाही फलंदाजाने १० धावांचा आकडाही पार केला नाही. सुनील नारायण, आंद्रे रसेल आणि टीम साऊदी शून्य धावेवर तंबूत परतले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

यावेळी गोलंदाजी करताना कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना १४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मुस्तफिजुर रहमानने ४ षटके गोलंदाजी करताना १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच, चेतन साकारिया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.

या विजयासह दिल्ली संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तसेच, कोलकाता संघ आठव्या स्थानी कायम आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

यंदाच्या हंगामात फक्त भारतीयांचाच दबदबा! सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ‘या’ ४ पठ्ठ्यांचा समावेश

भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या उमरानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘एके दिवशी…’

वेगाचे बादशाह! उमरान मलिक ते इशांत शर्मा, जाणून घ्या कोण आहे भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---