सनरायझर्स हैदराबाद कडून मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर श्रेयस अय्यर पूर्णपणे चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. २२० धावांचा पाठलाग करताना काय झालं? यापेक्षा २१९ धावा कशा झाल्या याच विचारात श्रेयस अडकून पडला होता. या सामन्यात झालेल्या पराभवासाठी त्याने सनरायझर्सचे सलामी फलंदाज डेविड वॉर्नर व वृद्धिमान साहा या दोघांना जबाबदार धरले आहे. त्यांनी उत्तम खेळ केला, असेही श्रेयस म्हणाला.
लागोपाठ तीन सामने गमावणे म्हणजे वाईटच
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या संघाच्या पराभवानंतर सांगितले की, “हा निश्चितच आमच्यासाठी मोठा पराभव आहे. परंतु याक्षणी आम्ही अजूनही सुरक्षित आहोत. आमच्याकडे अद्याप दोन खेळ शिल्लक आहेत. परंतु एक विजय खरोखर महत्वाचा आहे. आम्ही शेवटच्या तीन सामन्यांची वाट पाहत होतो. बॅक-टू-बॅक 3 सामने गमावणे खरोखर वाईट आहे. परंतु आम्ही स्पर्धेत पुनरागमन करू व त्यासाठी आमचा संघ सकारात्मक आहे.”
‘पावरप्ले’ मध्येच गमावला होता सामना
श्रेयसने आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, “आम्ही पावरप्लेमध्येच हा खेळ गमावला. त्यांनी पहिल्या सहा षटकांत ७० धावा केल्या. अशा परिस्थितीत आम्हाला खेळात परत येणे खूप अवघड झाले. दोघांच्या विकेटसाठी काय करावे हे निश्चितपणे अवघड होते कारण ते त्यांची खेळी बदलत राहिले होते. या खेळपट्टीवर टॉस गमावणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची याचा विचार करत होतो, दुर्दैवाने मी नाणेफेक जिंकलो आणि प्रथम गोलंदाजी केली. आम्हाला वाटले होते की गोलंदाजी मोठी भूमिका साकारेल, पण दुसर्या डावात चेंडू थोडा थांबून येत होता.”
हैदराबादच्या चांगल्या सुरुवातीमुळे संघ दबावात
श्रेयस अय्यर पुढे म्हणाला, “आम्ही विरोधी फलंदाजांबद्दल बराच विचार करतो आणि जेव्हा आम्ही मैदानावर असतो, तेव्हा आम्ही आमच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करतो. पण दुर्दैव म्हणजे आम्ही आज चमकदार कामगिरी केली नाही. त्यांनी फलंदाजी सुरू केल्यापासूनच आमच्यावर दबाव आला. २१९ धावांपर्यंत पोहोचणे ही हैदराबादची कौतुकास्पद कामगिरी होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय
ट्रेंडिंग लेख-
-बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे