नवी दिल्ली। सध्याच्या काळात भारतीय संघ क्रिकेट जगतातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक आहे. मागील २ दशकांदरम्यान बीसीसीआयने भारतीय क्रिकेटला मजबूत बनविण्यासाठी प्रत्येक स्तरावर चांगले काम केले आहे. त्यामुळे आज प्रत्येक स्तरावर भारतीय संघ एक बलाढ्य संघ आहे आणि घरेलू क्रिकेटमध्येही शानदार प्रदर्शन करताना दिसत आहे. जिथे सध्या भारतीय कसोटी क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी अनेक खेळाडू घरेलू क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे खेचत आहेत. असाच दिल्ली संघासाठी मोझ मुरगई एक असा खेळाडू आहे, जो १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचे विजेतेपद दिल्ली संघाला मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करू शकतो.
दिल्ली संघाने आपले शेवटचे रणजी ट्रॉफीचे विजेतेपद हे २००७-०८ हंगामादरम्यान १६ वर्षांनंतर जिंकले होते. त्यानंतर आतापर्यंत त्यांना भारतीय घरेलू क्रिकेटमधील सर्वात मोठी ट्रॉफी जिंकण्यात अपयश येत आहे. अशामध्ये दिल्ली संघासाठी घरेलू क्रिकेटमध्ये उद्योन्मुख अष्टपैलू मोक्ष मुरगई कमाल करण्याची क्षमता ठेवतो. मोक्षने माय खेलशी संवाद साधताना आपली योजना आणि खेळण्याच्या पद्धतीबाबत चर्चा केली आहे.
धोनी आहे आदर्श व्यक्ती
मोक्षने आतापर्यंत अनेक स्तरावर आपल्या फलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. विशेष म्हणजे मोक्षने ज्यूनियर १४ वर्षांखालील, ज्यूनियर १६ वर्षांखालील आणि सिनियर १९ वर्षांखालील संघांपासून सर्व श्रेणींंमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त मोक्षने रेल्वे रणजी ट्रॉफी आणि २३ वर्षांखालील शिबिरातही भाग घेतला आहे. आणि लखनऊ येथे २०१९ मध्ये आयोजित केलेल्या एका स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मोक्षने सांगितले की, त्याने ७ वर्षांचा असल्यापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
तो म्हणाला, “एमएस धोनी नेहमी माझ्यासाठी आदर्श व्यक्ती राहिले आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी वयाच्या ७ व्या वर्षापासून व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. सध्या मी माझ्या कॉलेज संघाचा कर्णधार आहे आणि अनेक स्तरावर आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचे काम केले आहे.”
आतापर्यंत ठोकले आहेत ३० शतके आणि ५० अर्धशतके
मोक्षने डीडीसीए लीग २०१८-१९ मध्ये भाग घेत आपल्या अष्टपैलू खेळीनेही सर्वांना प्रभावित केले. यादरम्यान त्याने १२०० पेक्षाही अधिक धावा आणि २० पेक्षा अधिक विकेट्स आपल्या नावावर करण्याची कामगिरी केली. मोक्षच्या उत्कृष्ट कामगिरीने त्याला २०१९-२० मध्ये मेरठच्या एसएच स्पोर्ट्सशी करार करण्याची संधी मिळाली.
घरेलू आणि विभागीय स्तराव मोक्षने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत २५० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ३० पेक्षा अधिक शतके आणि ५० पेक्षा अधिक अर्धशतके आपल्या नावावर केली आहेत.
दुखापतीतून करतोय पुनरागमन
विशेष म्हणजे मोक्ष पाठीच्या दुखापतीतून पुनरागमन करत आहे. त्याला २०१९ मध्ये पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला जवळपास १ महिना बेडवरून उठता आले नव्हते. तरीही त्यानंतर त्याने कठोर मेहनत आणि सातत्यामुळे मैदानात पुन्हा एकदा पुनरागमन केले.
महत्त्वाच्या बातम्या-
-या दिग्गज खेळाडूची १९ वर्षीय मुलगी आहे खूपच सुंदर; सोशल मीडियावर आहेत भरपूर फॉलोवर्स
-आयसीसी क्रमवारीत ख्रिस वोक्सची मोठी झेप; आर अश्विनला धोका
-१३ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा
ट्रेंडिंग लेख-
-या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश
-आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू
-अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार






