आयपीएल 2024 मध्ये चाहते आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याची आतुरतेनं वाट पाहत होते, कारण या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर आमनेसामने येणार होते. कोहली आणि गंभीर जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वातावरण तापलेलं असतं.
आयपीएलच्या शेवटच्या सीझनमध्ये जेव्हा गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता, तेव्हा विराट कोहलीसोबत त्याचा मैदानावर वाद झाला होता. तर आयपीएल 2013 मध्ये जेव्हा गंभीर केकेआरचा कर्णधार होता तेव्हाही त्याचं कोहलीसोबत वाजलं होतं. गौतम गंभीर यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. त्यामुळे यावर्षी काय होतं हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
मात्र यावेळी विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांनीही परिपक्वता दाखवली आणि त्यांच्यातील वाद आणखी वाढू दिला नाही. जेव्हा आरसीबीच्या डावात ‘टाइम आऊट’ होता तेव्हा दोन्ही खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करताना आणि मिठी मारताना दिसले. आता दिल्ली पोलिसांनी याचा फायदा घेत सोशल मीडियावर एक पोस्ट केली, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.
दिल्ली पोलिसांनी कोहली आणि गंभीरचा फोटो फेसबुकवर शेअर केला आणि लिहिलं, ‘कोणत्याही अडचणीत मदत करण्यासाठी 112 तयार आहे’ फोटोबद्दल बोलायचं झालं तर त्यात लिहिलं आहे, “मारामारी झाली? 112 डायल करा आणि भांडण मिटवा… कोणतंही भांडण ‘विराट’ किंवा ‘गंभीर’ नसतं.” दिल्ली पोलिसांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
Kisi bhi problem mein madad ke liye 112 hai taiyaar!#RCBvKKR#IPL2024#IPL#Dial112 pic.twitter.com/TUm1ZKd416
— Delhi Police (@DelhiPolice) March 29, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं विराट कोहलीच्या नाबाद 83 धावांच्या खेळीच्या जोरावर 182 धावा केल्या. कोहलीशिवाय आरसीबीचा दुसरा कोणताही फलंदाज 40 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. या धावसंख्येचा पाठलाग करताना फिलिप सॉल्ट (30) आणि सुनील नेरन (47) यांनी केकेआरला झंझावाती सुरुवात करून दिली. या दोघांनी 6.3 षटकांत 86 धावा जोडल्या. यानंतर व्यंकटेश अय्यरचं अर्धशतक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 39 धावांच्या जोरावर संघानं 19 चेंडू आणि 7 गडी शिल्लक असताना धावसंख्या गाठली.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला आर अश्विन; म्हणाला, “ही पहिलीच वेळ नाही जेव्हा…”