---Advertisement---

डेव्हिड विलीच्या जागी लखनऊमध्ये ‘या’ दमदार खेळाडूचं आगमन, न्यूझीलंडसाठी करतो तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजी

---Advertisement---

इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीनं आयपीएल 2024 मधून माघार घेतली आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं त्याला लिलावात 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र आता त्यानं वैयक्तिक कारण सांगून स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतलं आहे. विलीच्या जागी लखनऊनं न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचा संघात समावेश केला.

लखनऊनं हेन्रीला 1.25 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत संघात सामील केलंय. आयपीएलनं मीडिया ॲडव्हायझरी जारी करून म्हटलं की, “न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी लखनऊ सुपर जायंट्ससोबत करार केला आहे. हेन्री इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीच्या जागी संघात आला, ज्यानं वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. हेन्री 1.25 कोटींच्या मूळ किमतीत संघात सामील झाला आहे.”

मॅट हेन्री या आधीही आयपीएलचा भाग राहिला आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जच्या संघाचा भाग होता. हेन्रीनं आयपीएलमध्ये 2 सामने खेळले आहेत, जे तो 2017 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला होता.

मॅट हेन्री हा न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळणारा गोलंदाज आहे. आतापर्यंत त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 25 कसोटी, 82 एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 49 डावांत गोलंदाजी करताना त्यानं 32.41 च्या सरासरीनं 95 बळी घेतले. तर 33 डावांत फलंदाजी करताना 600 धावा केल्या आहेत.

हेन्रीनं एकदिवसीय सामन्यांच्या 80 डावांमध्ये गोलंदाजी करताना 26.4 च्या सरासरीनं 141 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यानं 35 डावांमध्ये फलंदाजी करताना 255 धावा केल्या आहेत. याशिवाय त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 16 डावात 20 विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याची इकॉनॉमी 8.13 एवढी राहिली.

34 वर्षीय डेव्हिड विलीनं गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. आपण डेव्हिड विलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्यानं इंग्लंडसाठी 73 एकदिवयीस सामन्यांमध्ये 100 बळी आणि 663 धावा नोंदवल्या आहेत. तर, टी 20 क्रिकेटमध्ये त्यानं 43 सामन्यात 51 बळी मिळवले. त्याला इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला आर अश्विन; म्हणाला, “ही पहिलीच वेळ नाही जेव्हा…”

‘आम्हाला धोका दिला’, होमग्राउंडवरील धक्कादायक पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याची प्रतिक्रिया । RCB Vs KKR

आरसीबीच्या स्वप्नांची धुळधाण उडवणाऱ्या व्यंकटेश अय्यरने मारलेला सर्वांत लांब षटकार पाहिलात का? – पाहा Video

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---