---Advertisement---

‘आम्हाला धोका दिला’, होमग्राउंडवरील धक्कादायक पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याची प्रतिक्रिया । RCB Vs KKR

RCB-skipper-Faf-du-Plessis
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघात शुक्रवारी (दि. 29) चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगतदार सामना झाला. परंतू अखेरीस या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. स्वतःच्या होम ग्राउंडवर झालेला हा पराभव आरसीबीच्या जिव्हारी लागणारा होता. विराटने कोहलीने शानदार अर्धशतक झळकावून 182 धावांचा डोंगर उभारला होता. परंतू कोलकाताने 7 विकेट्स राखून आणि 19 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने प्रतिक्रिया देताना संघाच्या पराभवाचे कारण सांगितले. ( RCB skipper Faf du Plessis after losing to KKR )

आयपीएल 2024 मध्ये बंगळुरु संघाला कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात यंदा दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रतिक्रिया दिली तेव्हा त्याने कोलकाता विरुद्ध पराभव कशामुळे झाला, त्याचे कारण सांगितलं. महत्वातं म्हणजे फाफने या पराभवासाठी कोणत्याही खेळाडूला जबाबदार धरले नाही. नेमकं काय म्हणाला फाफ ते आपण पाहुयात…

सामना संपल्यानंतर बोलताना फाफ डू प्लेसिसने चिन्नास्वामी मैदानाच्या खेळपट्टीला पराभवासाठी जबाबदार धरले. आम्हाला खेळपट्टीने धोका दिला, असं तो म्हणाला. “पहिल्या डावात आम्हाला वाटलं की खेळपट्टी दुहेरी वेगाची आहे. तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळी गोलंदाजांनी कटर्स, बॅक ऑफ द लेंद बॉलिंग केली त्यावेळी त्यांना संघर्ष करावा लागला. हे पाहता आम्हाला याचा फायदा होईल असं वाटलं होतं. 182 धावा हा चांगला स्कोअर आहे, असंही वाटलं होतं. आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करातना विराट कोहलीला शॉट मारण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, कारण तिथं वेग कमी होता, दुहेरी वेग होता.” असं फाफ डू प्लेसिस म्हणाला.

“मॅक्सवेलला गोलंदाजी देऊन प्रयत्न केला. बंगळुरुमध्ये फिंगर स्पिनर प्रभावी ठरतो. मात्र बॉलला स्पिन मिळत नव्हती. डावं उजवं समीकरण चांगलं असतं. पण तुम्ही पाहिलं असेल की व्यंकटेश अय्यर चांगली फटकेबाजी करत होता. ग्राऊंड छोटं असल्यानं स्पिनरला देखील फटके मारले जात होते.” असेही फाफने सांगितले. फाफ डू प्लेसिसने यावेळी बोलताना विजयकुमार वैश्य आणि कर्ण शर्माबाबत देखील भाष्य केले. विजयकुमार वैश्य शानदार गोलंदाजी करतो मात्र त्याला संधी मिळाली नाही. आम्ही पहिल्या डावाचा अंदाज घेत कर्ण शर्माला संधी देण्याबाबत विचार केला. जो बॉलर्स स्लोअर्स टाकू शकेल त्याला आम्ही संधी देण्याचा विचार केला होता, असे फाफने सांगितले.

अधिक वाचा –
– “ले-ले, ले-ले भाई, लास्ट है”, डीआरएससाठी खलील अहमदची वारंवार विनंती, ऋषभ पंतनं काय केलं? जाणून घ्या
– तो क्रिजवर येताच गोलंदाज थरथर कापायचे!…वीरेंद्र सेहवाग आजच्याच दिवशी बनला होता ‘मुलतानचा सुलतान’
– न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार, उन्मुक्त चंदला मात्र स्थान नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---