---Advertisement---

प्रेम अजून संपले नाही! RCB विरुद्ध KKR सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची गळाभेट, Video तूफान व्हायरल – पाहा

Virat-and-gambhir
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 चा दहावा सामना हा चिन्नास्वामी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघात सुरु आहे. हा सामना आता आरसीबी आणि केकेआर संघाच्या चाहत्यांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला आहे. याचे कारण चालू सामन्यात चाहत्यांना आणि खेळाडूंनाही न कल्पित अशी गोष्ट पाहायला मिळालीये. 2023 साली एकमेकांच्या विरोधात मैदानावर शेरेबाजी करणारे विराट कोहली आणि गौतम गंभीर हे आज (दि. 29) पुन्हा एकदा आमनेसामने आले. परंतू आज या दोघांत जे झाले त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा गोड धक्का बसला आहे. ( Virat Kohli and Gautam Gambhir Hug on Field During RCB vs KKR in IPL 2024 Watch Video )

मैदानावर नेमकं काय घडलं?
बंगळूरूच्या चिन्नस्वामी मैदानावर आरसीबी आणि केकेआर यांच्यात सामना सुरु होता. हा आयपीएलचा दहावा सामना होता. विराटने ह्या सामन्यातही आपला फॉर्म दाखवत दणदणीत अर्धशतक झळकावले. अगदी पहिल्या ओव्हरपासून विराट मैदानावर तळ ठोकून राहिला. त्यामुळे कोलकाता संघाची चांगलीच दाणादाण उडाली. परंतू विराटची फलंदाजी ही सर्वांनाच भारावून टाकणारी आणि नेत्रदीपक अशी होती. विराटच्या ह्या फलंदाजीमुळे त्याचा कथित विरोधक मानला जाणारा गौतम गंभीर देखील खूश झाला आणि ब्रेक दरम्यान तो थेट मैदानावर आला.

कोलकाता विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने उत्तम फलंदाजी केली. त्यावेळी स्ट्रॅटेजिक टाईम आऊटदरम्यान ही मोठी घटना पाहायला मिळाली. अडीज मिनिटांच्या ब्रेक दरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर हे एकमेकांसमोर आले आणि त्यांनी एकमेकांना चक्क मिठी मारली. तसेच त्यांच्या गळाभेटीने चाहतेही चांगलेच सुखावले. तसेच विराटच्या दमदार खेळीचे गंभीरने कौतूक केल्याचे सर्वांनी पाहिले. या दोघांच्या गळाभेटीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ( Virat Kohli and Gautam Gambhir Hug on Field )

अधिक वाचा –
– तो क्रिजवर येताच गोलंदाज थरथर कापायचे!…वीरेंद्र सेहवाग आजच्याच दिवशी बनला होता ‘मुलतानचा सुलतान’
– न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार, उन्मुक्त चंदला मात्र स्थान नाही
– रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली चालू सामन्यात अंपायरशी भिडले, ‘या’ नियमावरून गोंधळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---