---Advertisement---

न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार, उन्मुक्त चंदला मात्र स्थान नाही

New-Zealand-national-cricket-team
---Advertisement---

न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. कॅनडाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कोरी अँडरसनचा अमेरिकेच्या संघात समावेश करण्यात आला. त्याच्याशिवाय भारताकडून अंडर-19 स्तरावर खेळणाऱ्या हरमीत सिंगलाही संघात स्थान मिळालं आहे. मात्र, उन्मुक्त चंदचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.

कोरी अँडरसन बराच काळ न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळला आहे. अँडरसननं किवी संघाकडून 13 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं नोव्हेंबर 2018 मध्ये न्यूझीलंडकडून शेवटचा टी-20 सामना खेळला होता. आता तो तब्बल पाच वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

मेजर लीग क्रिकेटच्या आगमनानंतर, अनेक खेळाडूंनी आपला तळ अमेरिकेत हलवला होता. आता हे खेळाडू अमेरिकेच्या राष्ट्रीय संघासाठी खेळण्यास पात्र झाले आहेत. कोरी अँडरसननंही 2020 मध्ये अमेरिकेत तळ हलवला होता. तेव्हापासून त्यानं तेथे खूप धावा केल्या आहेत.

अँडरसन शिवाय भारतीय अंडर-19 संघाचा माजी खेळाडू हरमीत सिंगलाही अमेरिकेच्या संघात स्थान मिळालं आहे. त्याची मेजर लीग क्रिकेट दरम्यान देशांतर्गत खेळाडूंमध्ये सर्वात आधी निवड झाली होती. तसेच दिल्ली आणि आरसीबीचा माजी फलंदाज मिलिंद कुमारलाही संघात स्थान मिळालं आहे. कॅनडाचा माजी कर्णधार नितीश कुमार आता आपल्याच संघाविरुद्ध खेळताना दिसणार आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, भारताचा अंडर-19 विश्वचषक चॅम्पियन कर्णधार उन्मुक्त चंद याला अमेरिकेच्या संघात संधी देण्यात आलेली नाही. उन्मुक्तनं एमआयएलसीच्या तीन हंगामात 1500 धावा केल्या. त्यानं राष्ट्रीय टी-20 आणि सराव सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली. असं असतानाही त्याला संधी मिळालेली नाही.

कॅनडाविरुद्धच्या T20 मालिकेसाठी यूएसए संघ

मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उपकर्णधार), कोरी अँडरसन, गजानंद सिंग, जेसी सिंग, सौरभ नेत्रावलकर, निसाग्रा पटेल, स्टीव्ह टेलर, अँड्रियास गॉस, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्क्विक, नास्तुश प्रदीप केंझिगे, मिलिंद कुमार, नितीश कुमार आणि उस्मान रफिक.

महत्त्वाच्या बातम्या-

“येत्या 2 वर्षात तो भारतासाठी खेळेल”, रियान परागबाबत माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

“धोनीला पाहताच मोहित शर्मानं…”, मैदानावरील व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही एकदा पाहाच

रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली चालू सामन्यात अंपायरशी भिडले, ‘या’ नियमावरून गोंधळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---