---Advertisement---

तो क्रिजवर येताच गोलंदाज थरथर कापायचे!…वीरेंद्र सेहवाग आजच्याच दिवशी बनला होता ‘मुलतानचा सुलतान’

VIRENDER-SEHWAG
---Advertisement---

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक त्रिशतक झळकावलं होतं! मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात सेहवागनं पाकिस्तानी गोलंदाजांचं अक्षरश: कंबरडं मोडलं होतं. यासह तो कसोटीत त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला.

सौरव गांगुलीच्या अनुपस्थितीत राहुल द्रविड टीम इंडियाची कमान सांभाळत होता. वीरूच्या या ऐतिहासिक खेळीनंतर त्याला ‘मुलतानचा सुलतान’ हे टोपण नाव देण्यात आलं. सेहवागनं त्रिशतक पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानचा मुख्य फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकला मारलेला ऐतिहासिक षटकार क्रिकेटप्रेमींना अजूनही आठवतो.

3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सौरव गांगुलीच्या जागी राहुल द्रविडनं कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतली. द्रविडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं पहिल्याच दिवशी 2 बाद 356 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वीरेंद्र सेहवाग 228 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या दिवशी सर्वांना सेहवागकडून त्रिशतकाची अपेक्षा होती आणि वीरूनं कोणालाही निराश केलं नाही. त्यानं शानदार त्रिशतक झळकावून इतिहासात आपलं नाव कोरलं.

वीरेंद्र सेहवागनं त्याच्याच शैलीत त्रिशतक पूर्ण केलं. 295 धावांवर असताना सेहवागनं सकलेन मुश्ताकच्या चेंडूवर मोठा षटकार ठोकत त्रिशतक पूर्ण केलं. यासह तो पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय ठरला. सेहवागनं 1989 मध्ये लाहोर कसोटी सामन्यात 218 धावांची खेळी करणाऱ्या संजय मांजरेकरचा विक्रम मोडला. वीरू मुलतानमध्ये 375 चेंडूत 39 चौकार आणि 6 षटकारांसह 309 धावा करून बाद झाला.

29 मार्च हा दिवस सेहवागसाठी आणखी एका कारणासाठी खास आहे. 2008 मध्ये या दिवशी तो कसोटीत सर्वोच्च डाव खेळणारा भारतीय बनला. त्यानं स्वतःचा 309 धावांचा विक्रम मोडीत काढला. चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सेहवागनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 धावा करत स्वत:चा विक्रम मोडला.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार, उन्मुक्त चंदला मात्र स्थान नाही

“येत्या 2 वर्षात तो भारतासाठी खेळेल”, रियान परागबाबत माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

“तीन दिवसांपासून अंथरुणावर पेन किलर घेत होतो”, राजस्थानला एकहाती सामना जिंकवून दिल्यानंतर रियान पराग भावूक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---