आयपीएलमध्ये खेळाडू केवळ आपल्या खेळानंच रसिकांचं मनोरंजन करत नाहीत तर कधीकधी त्यांच्या वागणुकीनंही चाहत्यांचं मनोरंजन होतं. आयपीएल 2024 च्या 9व्या सामन्यात असाच एक प्रकार समोर आला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यातील ऋषभ पंत आणि खलील अहमद यांच्यातील संवाद आता चांगलाच व्हायरल होत आहे. खलील आणि पंत यांच्यात डीआरएससंदर्भात हे संभाषण सुरू होतं.
खलील अहमद सामन्यातील 15 वं षटक टाकत होता. तर राजस्थानकडून ध्रुव जुरेल फलंदाजीसाठी क्रीजवर होता. खलीलनं ध्रुवला पहिला चेंडू टाकला. चेंडू बॅटला आदळल्यानंतर पॅडला लागला. त्यावर खलीलनं अंपायरकडे जोरदार अपील केलं. पंचांनी त्याचं अपील फेटाळलं. मात्र खलीलला विश्वास होता की चेंडू बॅटला लागला नाही. यावर तो कर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे वळला. खलीलनं ऋषभ पंतला डीआरएस घेण्यासाठी पटवण्यास सुरुवात केली.
डीआरएस घेण्यासाठी शेवटचे 15 सेकंद जवळ येत असताना खलीलनं कर्णधारावर दबाव आणण्यास सुरुवात केली. खलील म्हणतो, “घे घे, भाई, हे शेवटचं आहे… यावर कर्णधार म्हणतो, हे तर तु सांगशील ना की बॅट लागली की नाही.” हे संभाषण ऐकून समालोचकांनाही हसू आवरत नाही. या दोघांच्या या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मात्र, खलीलनं विनंती करूनही ऋषभ पंत डीआरएस घेत नाही. कर्णधाराचा हा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध होतं. रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागल्यानंतर पॅडला लागल्याचं दिसतं.
View this post on Instagram
28 मार्च रोजी झालेल्या आयपीएल 2024 च्या या 9व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीचा संघ 12 धावांनी पराभूत झाला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सनं 20 षटकांत 5 गडी गमावून 185 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला केवळ 173 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली चालू सामन्यात अंपायरशी भिडले, ‘या’ नियमावरून गोंधळ
राजस्थानविरुद्ध बाद झाल्यानंतर ऋषभ पंतला राग अनावर, रागाच्या भरात भिंतीवर बॅट मारली; व्हिडिओ व्हायरल
राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा पराभव, ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाचं कारण काय?