IPLक्रिकेटटॉप बातम्या

हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला आर अश्विन; म्हणाला, “ही पहिलीच वेळ नाही जेव्हा…”

मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्याला सतत टीकेला सामोरं जावं लागत आहे. आयपीएल 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या मुंबईच्या दोन्ही सामन्यांदरम्यान चाहत्यांनी हार्दिक पांड्याला खूप शिवीगाळ केली. आता टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हार्दिकच्या समर्थनार्थ आला आहे. “हे असं काही प्रथमच झालेलं नाही”, असं तो म्हणाला.

आर अश्विननं कर्णधारपदाचं गणित समजावून सांगितलं. एकेकाळी युवा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताचे दिग्गज खेळाडू कसे खेळले हे त्यानं सांगितलं. अश्विन म्हणाला, “ही काही पहिली वेळ नाही जेव्हा एखादा वरिष्ठ खेळाडू ज्युनियर खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. आपण असं दाखवत आहेत की असं यापूर्वी कधीही झालं नाही.”

अश्विन म्हणाला, “जर तुम्हाला एखादा खेळाडू आवडत नसेल आणि त्या खेळाडूचा तिरस्कार असेल, तर संघानं येऊन स्पष्टीकरण का द्यावं? आम्ही असं वागत आहोत की, असं यापूर्वी कधीच घडलं नाही. सचिन तेंडुलकर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळला. हे दोघं राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळले, तर हे तिघंही अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळले. एकेकाळी हे सर्व महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले. जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळते होते, तेव्हा ते सर्व दिग्गज खेळाडू होते.”

आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समधून ट्रेड मार्फत संघात आणलं. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईनं त्याला कर्णधार बनवण्याची घोषणा केली. मात्र मॅनेजमेंटचा हा निर्णय चाहत्यांना अजिबात आवडला नाही. आयपीएल 2024 च्या सुरुवातीपासूनच चाहते हार्दिक पांड्याचा तिरस्कार करताना दिसत आहेत. मैदानात चाहते हार्दिक पांड्याविरुद्ध जोरदार हुटिंग करत आहेत.

चाहत्यांच्या या भूमिकेवर अनेक दिग्गज खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इंग्लडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसन यानं या घटनेवर प्रतिक्रिया देत, “या आधी भारतीय खेळाडूचा असा अपमान कधीच पाहिला नाही”, असं म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीच्या स्वप्नांची धुळधाण उडवणाऱ्या व्यंकटेश अय्यरने मारलेला सर्वांत लांब षटकार पाहिलात का? – पाहा Video

‘आम्हाला धोका दिला’, होमग्राउंडवरील धक्कादायक पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याची प्रतिक्रिया । RCB Vs KKR

प्रेम अजून संपले नाही! RCB विरुद्ध KKR सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची गळाभेट, Video तूफान व्हायरल – पाहा 

 

Related Articles