नामांकित बॅडमिंटन जोडी सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी १३ ऑक्टोबरपासून ओडेन्स येथे सुरू होणाऱ्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती अखिल भारतीय फेडरेशनने दिली आहे. याच स्पर्धेने बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय हंगामाला प्रारंभ होणार आहे.
लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाने सांगितले की, ‘‘मी डेन्मार्क खुल्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मी पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या आशियाई स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळेन.’’
साडेसात लाख अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या या स्पर्धेसाठी सायना-कश्यप यांनी गेल्या महिन्यात प्रवेशिका पाठवली होती. तसेच बॅडमिंटन संघटनेला संमतिपत्रही दिले होते.
करोना साथीमुळे मार्च महिन्यात ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा संपल्यापासून पुढील सर्व वार्षिक स्पर्धा खंडित झाल्या होत्या. जागतिक बॅडमिंटन महासंघाने थॉमस-उबर चषक स्पर्धा (३ ते ११ ऑक्टोंबर) आणि आशियातील तीन स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत. तसेच डेन्मार्क मास्टर्स स्पर्धा (२० ते २५ ऑक्टोबर) देखी रद्द करण्यात आली. परंतु डेन्मार्क खुली स्पर्धा या एकमेव स्पर्धेला कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आले नाही.
तंदुरुस्तीविषयक प्रश्नाला उत्तर देताना दोन वेळा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती सायना म्हणाली, ‘‘दुखापतीची कोणतीच समस्या नाही. तीन स्पर्धा जर तिथे असत्या तर ते योग्य ठरले असते. परंतु मी तरी जानेवारीपासून खेळण्याचे ठरवले आहे.’’
‘‘एखाद्या स्पर्धेसाठी एवढी जोखीम पत्करणे मला योग्य वाटत नाही. मी जानेवारीतच बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करीन,’’ असे क्रमवारीत २४व्या स्थानी असलेला कश्यप देखील म्हणाला.
तसेच पी. व्ही. सिंधूने या स्पर्धेतून आधीच माघार घेतली होती. आता सायनाने माघार घेतल्यामुळे ऑलिम्पिक वर्षभराच्या अंतरावर असताना महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणारे कोणीही नसणार आहे. आता किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, अजय जयराम, शुभंकर डे यांच्यावर पुरुष एकेरीत भारताची मदार असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020: हैदराबाद विरुद्ध पंजाब सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी
IPL 2020 : पाहा सध्या कोण आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी
आयपीएल २०२०: हैदराबाद-पंजाब सामन्यानंतर अशी आहे गुणतालिका, ‘हा’ संघ अद्याप तळाशीच
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
-IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ