---Advertisement---

Video: एकच ग्लोव्हज घालून फलंदाजीला आला हा फलंदाज; पुढे काय झाले ते पहाच

---Advertisement---

सध्या सुरु असलेल्या देवधर ट्रॉफी स्पर्धेत गुरुवारी पार पडलेल्या भारत अ विरुद्ध भारत क संघातील सामन्यात एक मजेशीर गोष्ट पहायला मिळाली. भारत अ संघाचा फलंदाज अंकित बावणे फलंदाजीसाठी एक ग्लोव्हज विसरुन फलंदाजीसाठी आला होता.

या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर अंकित 45 व्या षटकात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.

पण फलंदाजीसाठी येताना त्याने बरोबर एकच ग्लोव्हज आणला आणि तो हातात घातल्यानंतर त्याला दुसरा ग्लोव्हज विसरल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने त्याचा दुसरा ग्लोव्हज मागवून घेतला. त्याच्या या घटनेवर त्यालाही हासू लपवता आले नाही.

https://twitter.com/NaaginDance/status/1055353866701717509

अंकितला फलंदाजीत मात्र अपयश आले तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला विजय शंकरने फुल लेंथचा चेंडू टाकला होता. हा चेंडू अंकितने मारल्यानंतर मिड-विकेटला असणाऱ्या समर्थने त्याचा झेल घेतला आणि त्याला बाद केले.

या सामन्यात भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 293 धावा केल्या होत्या. परंतू भारत क संघाकडून युवा फलंदाज शुभमन गिलने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारत क संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयाबरोबरच भारत क संघाने देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यांच्या अंतिम सामना शनिवारी (27 आॅक्टोबर) फिरोज शहा कोटला, दिल्ली येथे भारत ब संघाविरुद्ध होणार आहे.

याआधीही आॅस्ट्रेलियाचा फलंदाज फवाद अहमद मार्च 2017 मध्ये शेफिल्ड शिल्डच्या एका सामन्यात फलंदाजीला येताना चक्क बॅट विसरला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment