खेळ म्हटलं की शारिरिक तंदुरुस्ती महत्त्वाची मानली जाते. भारतात विराट कोहलीसह अनेक युवा खेळाडूंनी तंदुरुस्तीसाठी सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. असे असतानाही असे काही क्रिकेटर असे आहेत, ज्यांनी शारिरिक कमतरता असतानाही त्यावर मात करत उत्तम कारकिर्द घडवली.
असेच हे ५ खेळाडू ज्यांनी शारिरिक कमी असतानाही घडवली मोठी कारकिर्द –
१. भगवत चंद्रशेखर – पोलिओ
भारतीय संघाकडून १९६४ ते १९७९ दरम्यान खेळणाऱ्या भगवत चंद्रशेखर हे पोलिओ झालेल्या हातांनी गोलंदाजी करायचे. त्यांच्या उजव्या हाताला पोलिओ झाला असल्याने ते त्यांच्या अनोख्या गोलंदाजीच्या पद्धतीमुळे ओळखले जायचे.
त्यामुळे त्यांच्या या शारिरिक कमजोरीलाच ताकद बनवून कारकिर्द घडवण्याबद्दल त्यांचे कौतुकही खूप झाले. त्यांनी भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले. त्यांनी ५८ कसोटी सामने खेळताना २४२ विकेट्स घेतल्या.
२. मार्टिन गप्टिल – पायाला ३ बोटे नाहीत
न्यूझीलंडचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल १३ वर्षांचा असताना त्याच्या पायाच्या खालचा भाग सामान उचलणाऱ्या लिफ्टमध्ये अडकला होता. ज्यामुळे त्याच्या डाव्या पायाची ३ बोटांना मोठी जखम झाली. परिणामत: त्याच्या पायाची ३ बोटे कापावी लागली. त्यामुळे लहानपणी त्याला पळतानाही त्रास होत होता.
परंतू त्याच्या कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला. गप्टिलनेही हार न मानता यावर मात करत क्रिकेटमध्ये स्वत:चे नाव कमावले. त्याने वनडेत खेळताना द्विशतकही केले. तो न्यूझीलंडचा टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत ८७ कसोटी, १८३ वनडे आणि ८८ टी२० सामने खेळले आहेत.
#Guptill was younger, a forklift drove over his toes and he had to get the three smaller ones removed! @Martyguptill pic.twitter.com/A8ZxA9PdbO
— Ziyad (@zzyadu) March 21, 2015
३. शोएब अख्तर – कोपऱ्याची दुखापत आणि सपाट पाय
रावळपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरचा कोपरा ४० डिग्रीपर्यंत वाकतो. साधारणत: सर्वांचा कोपरा २० ड्रिग्रीपर्यंत वाकू शकतो. याव्यतिरिक्त त्याचे तळपाय सपाट आहेत. त्यामुळे तो ५ व्या वर्षापर्यंत चालूही शकत नव्हता. तसेच त्याच्या डॉक्टरांनी सांगितले होते की त्याचे फुफ्फुसे कायम कमजोर राहतील. मात्र या सर्व गोष्टींवर त्याने मात केली.
विशेष म्हणजे त्याची फुफ्फुसे कमजोर होण्यापेक्षा त्यांचा विस्तार झाला. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना त्याचा फायदा झाला. पण त्यानेही सर्व शारिरिक कमजोरींवर मात करत मोठी कारकिर्द घडवली. त्याने पाकिस्तानकडून ४०० पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या.
४. जॉन्टी ऱ्होड्स – फिट येणे
जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकामध्ये गणल्या जाणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्सला फिट येण्याचा त्रास आहे. त्याला हा त्रास सौम्य प्रमाणात होता. पण तरीही डॉक्टरांनी त्याला डोक्याला इजा होईल अशी कोणतीही गोष्ट करण्यास मनाई केली होती. त्यामुळे त्याला खेळताना बऱ्याचदा काळजी घ्यावी लागायची.
त्याला आवडणारा रग्बी खेळही त्याला खेळता येत नव्हता. तो क्रिकेटच्या मैदानात क्षेत्ररक्षण करताना लहान असताना कधीकधी हेल्मेटही घालायचा. परंतू त्याने या त्रासावर मात केली आणि क्रिकेटमध्ये एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून नाव कमवले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत.
५. मन्सुर अली खान पतौडी – एका डोळ्याला अंधत्व
भारताचे दिग्गज माजी कर्णधार मन्सुर अली खान पतौडी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा एकदा मोठा अपघात झाला. त्या आपघातामध्ये त्यांच्या कारची काच त्यांच्या उजव्या डोळ्यात घुसली. त्यानंतर त्यातून सावरण्यासाठी त्यांना काही महिन्यांचा कालावधी लागला. डॉक्टरांनी क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला असतानाही त्यांनी हिंमत न हारता क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
त्यांनी अपघातानंतर काही महिन्यांतच भारताकडून पुन्हा कसोटी खेळण्यास सुरुवात केली. त्यांना त्यावेळी क्रिकेट खेळताना २ चेंडू दिसायचे पण त्यांनी नंतर आत येताना दिसणाऱ्या चेंडूवरच खेळण्याचा निर्णय घेतला. अनेकदा तर ते टोपीच्या सहाय्याने उजवा डोळा झाकायचे जेणेकरुन त्यांना एका डोळ्याने चेंडू दिसू शकेल.
त्यांनी २१ व्या वर्षी भारताच्या नेतृत्वाची जबाबदारीही घेतली होती. त्यांनी खेळलेल्या ४६ कसोटींपैकी ४० कसोटी सामन्यात त्यांनी भारताचे नेतृत्व केले. यातील ९ सामने त्यांनी जिंकलेही.
ट्रेंडिंग घडामोडी –
२१ वर्षांपुर्वी चौथ्या डावात लाराने अशी काही फलंदाजी केली की सगळं जग लाराचा झालं फॅन
टाॅप ४- सचिनसह या तीन खेळाडूंनी वाढदिवसाच्या दिवशी केल्या आहेत शतकी खेळी






