भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रविवारी (10 सप्टेंबर) चांगल्या फॉर्ममध्ये होता. रविवारी हा सामना पावरामुळे पूर्ण होऊ शकला नाही. रोहितने भारतासाडी डावाची सुरुवात केली आणि अप्रतिम अर्धशतक देखील केले. असे असले तरी, त्याला या अर्धशतकाचे रुपांतर शतकात करता आले नाही. रोहित एक चुकीचा शॉट खेळून झेलबाद झाल्यामुळे भारताचा माजी दिग्गज गौतम गंभीर याने नाराजी व्यक्त केली.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) दरम्यान समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोरच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सोमवारी (11 सप्टेंबर) हा सामना खेळवला जाईल. नाणेफेक गमावल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. 24.1 षठकांचा खेळ झाला असून भारताने 2 बाद 147 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 49 चेंडूत 56 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. रोहित लयीत असल्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती. पण त्यापूर्वी एका चुकीच्या शॉटवर तो फाहीम अक्षफ याच्या हातात तो झेलबाद झाला. यावेळी शादाब खान गोलंदाजी करत होता. गौतम गंभीरच्या मते रोहित ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावर तो स्वतः देखील नाखुश असेल.
समालोचनादरम्यान गौतम गंभीर म्हणाला, “मला वाटते रोहित स्वतः देखील खूप निराश असेल. ज्या पद्धतीने तो बाद झाला, तो खूपच खराब शॉट होता. त्यालाही माहीत आहे की, हा शॉट टीका करण्यासारखा आहे. कारण पाकिस्तान संघ त्यावेळी खूपच मागे पडला होता. असे वाटत होते की, भारत 370-375 धावा करेल. पण तितक्यात रोहित बाद झाला आणि त्यानंतर शुबमन गिल देखील पुढच्याच षटकात बाद झाला. पाकिस्तानसाखे गोलंदाजी आक्रमण असणाऱ्या संघाला, तुम्ही पुनरागमनाची जराही संधी दिली नाही पाहिजे. तुम्ही त्याच गोलंदाजाविरोधात चुकीचा शॉट खेळला, ज्याने याआधी 30 धावा केल्या आहेत. तुम्ही खेळपट्टीवर फक्त उफस्थित जरी असता, तरी प्रत्येक षटकात एक किंवा दोन चेंडून मारण्यासारखे आले असते.”
दरम्यान, रोहितसोबत सलामीला आलेला शुबमन गिल डावातील 18 व्या षटकात वैयक्तिक 58 धावांची खेळी करून आगा अस्लम याच्या हातात झेलबाद झाला. त्याने या धावा 52 चेंडूत केल्या असून शाहीन शाह आफ्रिदी याच्या नावावर त्याची विकेट झाली. (Despite Rohit Sharma’s half-century against Pakistan, Gautam Gambhir is unhappy with his performance)
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा कौतुकास्पद निर्णय! कुटुंबीयांनीच जाहीर केली वर्ल्डकप टीम
“पावसाने आम्हाला वाचवलं”, अख्तरची भारत-पकिस्तान सामन्याविषयी मोठी कबुली