आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मधील अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा प्रवास 10 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्धच्या सामन्यानंतर संपला. अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून 15 चेंडू शिल्लक असताना पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला आणि संघाला लीग स्टेजमधून बाहेर पडावे लागले. हा सामना गमावूनही अफगाणिस्तान संघाने आपल्या फिरकी गोलंदाजांच्या जोरावर अनोखी कामगिरी केली आहे.
खरं तर, अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फिरकी गोलंदाजीनी एकूण 40 षटके टाकली, जो एक मोठा विक्रम ठरला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात यापूर्वी कधीही एका डावात फिरकी गोलंदाजीची इतकी षटके पाहायला मिळाली नव्हती. आतापर्यंत, फिरकीपटूंनी एका डावात सर्वाधिक षटके टाकण्याचा संयुक्त विक्रम 39-39 असा होता, जो यूएईने 1996 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि 2011 मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता. मात्र, आता या दोन संघांना मागे टाकत अफगाणिस्तानने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानने चार फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर विश्वास व्यक्त केला. राशिद खान, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद यांच्या फिरकी चौकडीने मिळून 39 षटके टाकली, तर एक षटक लेग ब्रेक गोलंदाज असलेल्या रहमत शाहने टाकले. अशा प्रकारे एकूण 40 षटके फिरकीपटूंनी टाकली. यादरम्यान रशीद आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मुजीबला एक विकेट्स मिळाली. मात्र, नूर आणि रहमतला एकही विकेट मिळाली नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्वबाद 244 धावा केल्या, प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 47.3 षटकांत 5 विकेट्स गमावून 247 धावा करून विजय मिळवला. अशाप्रकारे, अफगाणिस्तानने विश्वचषक 2023 स्पर्धेतील नऊ सामन्यांमध्ये चार विजय आणि पाच पराभवांसह आपला प्रवास संपवला, ही विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची अफगाणिस्तानची सर्वोत्तम कामगिरी आहे. (Despite the defeat Afghanistan made history becoming the first team to do so)
म्हत्वाच्या बातम्या
अफगाणिस्तानच्या कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या विश्वचषकात आम्ही जगाला…’
सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका देणार ऑस्ट्रेलियाला मात! दिग्गजाचे महत्वपूर्ण विधान