इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल च्या १५व्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी प्रभावित केले. त्यातील एक नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू बेबी एबी म्हणजेच डेवॉल्ड ब्रेविस. मुंबई इंडियन्स संघाचा यंदाचा आयपीएल हंगाम निराशाजनक असला, तरी संघाला ब्रेविस सारखा खेळाडू मिळाला ही सर्वात मोठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. याच ब्रेविसने संघाचा कर्णधार रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केले आहे.
मुंबई इंडियन्सच्या ट्विटर पेजवर पोस्ट केलेल्या आपल्या वक्तव्यात ब्रेव्हिस म्हणाला की, “मला वाटते रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न आहे. तो तुम्हाला खरोखर पाठिंबा देतो आणि तो तुमच्यावर कोणताही दबाव आणत नाही. तुम्ही मैदानात जाऊन खेळाचा पुरेपूर आनंद घ्यावा अशी त्याची इच्छा असते.”
➡️ On #TATAIPL 2022
➡️ On Captain Hitman 🧢🏏Dewald Brevis on how #MI fought back in the second half after a tough start and his dream of playing under Captain RO 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @BrevisDewald @ImRo45 pic.twitter.com/4rNH43ozur
— Mumbai Indians (@mipaltan) June 6, 2022
पुढे ब्रेविस म्हणाला की, “सुरुवातीला आलेल्या अपयशानंतर, मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ च्या उत्तरार्धात पुनरागमन केले आणि त्यात कर्णधार रोहित शर्माची भूमिका महत्त्वाची होती. पुनरागमन आमच्यासाठी खूप कठीण होते. आम्ही फक्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला. विजय मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व आम्ही केले, आम्ही खूप सराव केला. पण, निकाल अनुकूल लागला नाही. पहिले ८ सामने आमच्यासाठी कठीण होते. पण, शेवटच्या ६ सामन्यांमध्ये आम्ही अधिक एकजुटीने खेळलो आणि काही सामने जिंकले.”
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपयांना विकत घेतले. ‘बेबी एबी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ब्रेविसने आयपीएलपूर्वी १९ वर्षांखालील विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. मात्र, आयपीएल २०२२ त्याच्यासाठी संमिश्र ठरले. मुंबई इंडियन्सकडून खेळताना ब्रेव्हिसने २३ च्या सरासरीने एकूण १६१ धावा केल्या. पण, त्याचा स्ट्राइक रेट १४२ च्या वर राहिला. आयपीएलच्या १५व्या हंगामात ब्रेव्हिसने एकूण १४ षटकार लगावले. मात्र, आयपीएलच्या या हंगामात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हिटमॅनबाबत घेतलेला तो निर्णय बरोबरच’, प्रशिक्षक राहुल द्रविडचा रोहितला पाठींबा
हार्दिक म्हणतोय, ‘वासिम जाफर आवडता खेळाडू’; कारणही सांगितलंय
उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळणार संधी? प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे महत्वाचे संकेत